Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : अमरावती जिल्ह्यात उन्हाळ्याच्या तोंडावर सिंचन प्रकल्पांत ६३ टक्के जलसाठा

Irrigatio Project : उन्हाळा सुरू झाला असताना व पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यातील ग्रामीण भागांना पोहोचण्याची शक्यता असताना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत ६३ टक्के जलसाठा ही समाधानकारक बाब मानली जात आहे.

Team Agrowon

Amravati News : अमरावती ः उन्हाळा सुरू झाला असताना व पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यातील ग्रामीण भागांना पोहोचण्याची शक्यता असताना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत ६३ टक्के जलसाठा ही समाधानकारक बाब मानली जात आहे. गत हंगामात झालेल्या पावसाची सरासरी यासाठी कारणीभूत असून सिंचनासाठी पाण्याची कमी मागणी झाल्याने प्रकल्पांमध्ये जलसाठा पर्याप्त प्रमाणात उपलब्ध आहे.

जिल्ह्यात अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पासह सात मध्यम व ४८ लघुप्रकल्प आहेत. विद्यमान स्थितीत ५६ सिंचन प्रकल्पांत ६६६ दलघमी (६३ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. अप्पर वर्धा प्रकल्पात ३८३ दलघमी साठा असल्याने अमरावती शहरासह या प्रकल्पावर अवलंबिलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी मुबलक पाणीपुरवठा करता येणार आहे. तर सात मध्यम प्रकल्पांत प्रकल्पीय सिंचन क्षमतेच्या तुलनेत १५० दलघमी साठा आहे.

लघुप्रकल्पांपैकी काही प्रकल्प उन्हाळ्यात तळ गाठतात. सद्यस्थितीत या ४८ प्रकल्पांत १३३ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. पाणी टंचाईच्या झळा प्रामुख्याने लघुप्रकल्पांच्या क्षेत्रात जाणवण्याची शक्यता आहे.

गत हंगामात पावसाने चांगली हजेरी लावत सरासरी गाठल्याने सिंचन प्रकल्पांत शंभर टक्के जलसाठा होऊ शकला. पाऊस सार्वत्रिक झाल्याने भूगर्भातील पाणीपातळीतही वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. याचा परिणाम शेतीसाठी लागणाऱ्या सिंचनासाठीच्या पाण्यावर झाला. यंदा भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सिंचनासाठी पाण्याची तुलनेने मागणी कमी झाली आहे. प्रकल्पातील पाण्याचा उठाव कमी झाल्याने पाणीपातळी कमी झाली नाही.

जलसाठ्याची स्थिती

प्रकल्प    जलसाठा (दलघमी)    (टक्के)

अप्पर वर्धा    ३८३    (६७ )

शहानूर    ३४.४९    ७४

चंद्रभागा    ३४.६४    ८३

पूर्णा    २८.०६    ७९

सपन    ३५.०३    ९०

पंढरी    १४.९७    २६

बोर्डी नाला    २.८१    २३

४८ लघू प्रकल्प    १३३.४६    ५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी

Farmer ID Scam: बनावट फार्मर आयडी, जमीन एकाची, अनुदान दुसऱ्याला, नेमका घोळ काय?

Kolhapur ZP President: कोल्हापूर ‘झेडपी’च्या अध्यक्षपदी शिल्पा खोत यांची बिनविरोध निवड

Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट

Unseasonal Rain Damage: शिरोळ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT