Soybean Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : अमरावती जिल्ह्यात लक्ष्यांकाच्या ०.०१ टक्का शासकीय सोयाबीन खरेदी

Soybean Market : गेल्या तीन महिन्यांत नाफेडच्या जिल्ह्यातील वीस केंद्रांवर २ लाख १० हजार क्विंटल सोयाबीनची हमीदराने शासकीय खरेदी करण्यात आली. त्यातुलनेत एकट्या अमरावती बाजार समितीमध्ये ७ लाख ६६ हजार क्विंटल सोयाबीनची उलाढाल झाली.

Team Agrowon

Amravati News : अमरावती ः गेल्या तीन महिन्यांत नाफेडच्या जिल्ह्यातील वीस केंद्रांवर २ लाख १० हजार क्विंटल सोयाबीनची हमीदराने शासकीय खरेदी करण्यात आली. त्यातुलनेत एकट्या अमरावती बाजार समितीमध्ये ७ लाख ६६ हजार क्विंटल सोयाबीनची उलाढाल झाली. शासकीय खरेदीच्या तुलनेत एकट्या बाजार समितीने साडेपाच लाख क्विंटलने अधिक उलाढाल केली आहे. त्यामुळे शासकीय खरेदीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

राज्यात १४ लाख १३ हजार २७० टन खरेदीचे लक्षांक निश्चित करणाऱ्या राज्य सरकारने १५ ऑक्टोबर ते १२ जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात तीन लाख १० हजार १६१ टन सोयाबीनची खरेदी केली आहे. अमरावती जिल्ह्याचा त्यामध्ये वाटा २१० मेट्रिक टन म्हणजे राज्याच्या लक्षांकात त्याचे प्रमाण केवळ ०.०१ टक्के आहे.

जिल्ह्यात सहा जानेवारी या मुदतवाढीच्या टप्प्यावर १९ हजार ८०१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १० हजार २६८ शेतकऱ्यांचा २ लाख १० हजार ५९५ क्विंटल सोयाबीन खरेदी झाला आहे. उर्वरित ९ हजार ५३३ शेतकऱ्यांना खुल्या बाजाराशिवाय पर्याय राहिलेला नाही. सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटलला हमीदर आहे, तर खुल्या बाजारात सरासरी ४२०० रुपये दर आहेत.

अमरावती बाजार समितीत सरासरी दराने सात लाख ६६ हजार ६२१ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. हमीदरापेक्षा चारशे ते पाचशे रुपये कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करावी लागली असून आता शासकीय खरेदीस मुदतवाढ न मिळाल्याने नुकसान सहन करण्याची वेळ राज्य सरकारने आणली आहे.

राज्यात २१ टक्के खरेदी
विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष ओढावू नये, यासाठी हमीदराने शासकीय खरेदी करण्याचा निर्णय लागू केला. राज्यासाठी १४ लाख १३ हजार २७० मेट्रिक टन इतके लक्षांक निश्चित करण्यात आले. मात्र १२ जानेवारीपर्यंत राज्यात ३ लाख १० हजार मेट्रिक टन खरेदी झाली आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादनाची सरासरी बघता ती नाममात्र ठरली आहे. राज्यात केवळ २१ टक्के सोयाबीनची शासकीय खरेदी झाली आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT