Amravati Bogus Seeds agrowon
ॲग्रो विशेष

Amravati Bogus Seeds : अंजनगावसूर्जीत अनधिकृत बियाणे साठा जप्त

Kharip Season Amravati : खरीप हंगामाच्या पूर्वीच शेतकऱ्यांची मागणी आणि गरज ओळखत एचटीबीटी (हर्बिसाइट टॉलरंट बीटी कॉटन) बोगस बियाण्यांचा अनधिकृतपणे पुरवठा केला जात आहे

Team Agrowon

Amravati Agriculture Department : अमरावती कृषी विभागाच्या पथकाने गोपनीयन माहिच्या आधारे केलेल्या कारवाईत तब्बल अडीच लाख रुपयांचा अनधिकृत बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी विनोद सरोदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची महिती पोलिसांनी दिली.

खरीप हंगामाच्या पूर्वीच शेतकऱ्यांची मागणी आणि गरज ओळखत एचटीबीटी (हर्बिसाइट टॉलरंट बीटी कॉटन) बोगस बियाण्यांचा अनधिकृतपणे पुरवठा केला जात आहे. यापूर्वी अमरावती आणि वर्धा येथील कारवाईत तीन लाख रुपयांपेक्षा अधिकचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर सोमवारी (ता. १९) रात्री अंजनगावसूर्जी येथील देवनाथ नगर येथे छापेमारी करून २ लाख ४४ हजार २८७ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.

देवनाथ नगर येथील विनोद सरोदे (वय ५४) हे अनधिकृत बियाण्यांचा व्यवसाय करीत असल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी अश्‍विन राठोड यांना मिळाली होती. त्याअधारे श्री. राठोड यांनी शेतकऱ्यांसारखे वेषांतर करीत विनोद सरोदे यांना बियाण्याची मागणी केली.

बियाणे मिळताच छापेमारी करुन साठा जप्त करण्यात आला. उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विराग देशमुख, तालुका कृषी अधिकारी भारती जाधव, कृषी अधिकारी नरेंद्र वसुकर, अश्‍वीन राठोड यांच्या पथकाने पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली.

अधिकृत सेवा केंद्रांतूनच खरेदीचे आवाहन

अनधिकृत एचटीबिटी बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसगत होत असली तरी पेरणी केल्याशिवाय ते लक्षात येत नाही. त्यामुळे शेतकरी हे बियाणे लावतात आणि फसतात. त्यांचा बियाणे आणि लागवडीवरील खर्चही वाया जातो. त्यामुळे अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे खरेदीचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT