Ambadas Danve agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Seeds : अंबादास दानवेंकडून संभाजीनगरमध्ये कृषी केंद्रांची पाहणी : योग्य दरात बियाणे, खतांची विक्रीचे करण्याचे निर्देश

Ambadas Danve : जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री व शेतकऱ्यांची फसगत होऊ नये यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगरमधील कृषी केंद्राना आकस्मिक भेट देत बियाणे व खतांची विक्री व साठा तपासणी करीत योग्य दरात बियाणे विक्रीचे करण्याचे निर्देश देण्यात आले.

Team Agrowon

Kharif Season: खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यभरात ठिकठिकाणी बोगस बियाणे, खतांच विक्री तसेच काळाबाजार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगरमधील कृषी सेवा केंद्रास भेट देऊन पाहणी केली.

छत्रपती शिवाजी महाराजकृषी उत्पन्न बाजार समिती येथील कृषी केंद्राला भेट दिल्यानंतर दानवे यांनी केंद्रातील बियाणे साठा व विक्री यासह वेगवेगळ्या खाते बुकाची पाहणी केली. यंदा कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही याची दक्षता कृषी विभागासह कृषी केंद्र चालकांनी घ्यावी. खत व बियाण्यांची चढ्या दराने विक्री करणाऱ्यांसह बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे दानवेनयांनी स्पष्ट केले.

यावेळी बियाणे खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी दानवे यांनी चर्चा करुन त्यांना बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला दिला. तसेच चांगला पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये असे सांगितले.

याप्रसंगी सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती मुरलीधर चौधरी, माजी सभापती जगन्नाथ काळे, कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी गणेश सरकलवाड, तालुका कृषी अधिकारी जगताप हर्षदा, पंचायत समिती कृषी अधिकारी आर.ए.पाटील, मंडळ कृषी अधिकारी विश्वास जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, किसान सेना जिल्हाप्रमुख नाना पळसकर, ज्ञानेश्वर डांगे,सतीश अंभोरे,उत्तम उकिर्डे,कैलास उकिर्डे व सद्दाम पठाण उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT