PM Modi Agrowon
ॲग्रो विशेष

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Dhananjay Sanap

टेक्स्टटाईल पार्कमुळे विदर्भात ८ ते १० हजार कोटींची गुंतवणूक उभी राहील. त्यातून विदर्भात १ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत व्यक्त केला. पंतप्रधान मोदी पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती निमित्त शुक्रवारी (ता.२०) वर्धा जिल्हयाच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी अमरावती येथील पीएम मित्र टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन केलं. अमरावती जिल्ह्यामध्ये १ हजार एकर टेक्स्टटाईल उभारण्यात येणार आहे. त्यातून कापूस उत्पादकांन आधार मिळेल, असा दावाही पंतप्रधानांनी केला आहे.

यावेळी मोदी म्हणाले, "विदर्भात उच्च गुणवत्तेचा कापूस उत्पादित होतो. परंतु कॉँग्रेस सरकारच्या काळात त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता मात्र पीएम मित्र अंतर्गत फार्म टू फॅशनच्या संकल्पनेवर आधारित वस्त्रोउद्योगाला चालना देण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भातील कापूस उत्पादकांचं होणारं नुकसान भरून निघेल. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा चांगला भाव मिळेल. त्यासाठी मूल्यसाखळी उभारणार आहे." असा दावा मोदींनी केला.

पीएम मित्र पार्कमधून 'फार्म टू फायबर', 'फायबर टू फेब्रीक', 'फेब्रीक टू फॅशन', 'फॅशन टू फॉरेन'च्या मदतीने या भागात इतर उद्योगांना चालना मिळेल. तसेच नवीन मूल्यसाखळी तयार होईल. त्यातून निर्यात वाढेल. यातून आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. असंही मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी कॉँग्रेस सरकारवर टिका केली. कॉँग्रेस सरकारनं कापूस उत्पादकांचं नुकसान केल्याचंही टिका मोदींनी केली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला दणका बसला. त्यामुळं आता विधानसभेच्या निवडणुकीत दणका बसू नये, यासाठी भाजपनं सावध पवित्रा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठोपाठ अमित शहांचाही विदर्भ दौरा आहे. विदर्भातील भाजपची कमी झालेली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

Weather Update : नक्षत्र बदलले; वातावरणात वाढला उन्हाचा चटका

SCROLL FOR NEXT