Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : अमळनेर तालुक्यात १४ गावांना पाण्याची टंचाई

Tanker Water Supply : मंगरूळ, चोपडाई, कोंढावळ या गावांत देखील पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आलेले आहेत.

Team Agrowon

Ja;gaon News : जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील भूजल पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे तालुक्यातील चार गावांतील जनतेची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यातील इतर सहा गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सोबतच तालुक्यातील इतरही चार ठिकाणी टँकर सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरी मिळविण्यासाठी पाठविण्यात आला आहे.

तालुक्यातील डांगर, जानवे, सबगव्हाण व तरवाडे या गावांतील जनतेची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. सोबत मंगरूळ, चोपडाई, कोंढावळ या गावांत देखील पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आलेले आहेत.

आतापर्यंत तालुक्यातील सहा गावांतील विहिरी प्रशासनाकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. तर टँकर भरण्यासाठी अमळनेर येथील नगरपालिका, धावडे येथील ग्रामपंचायत व भिलाली येथील ग्रामपंचायतींच्या विहिरी प्रशासनाकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. यात मंगरूळ येथे जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे.

मात्र, गावकऱ्यांनी बोरी नदीवरून पाणी नको, तापी नदीवरून पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे, त्यामुळे ही नियोजित पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. त्यामुळे आजच्या घडीला गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

खासदार, आमदारांकडून मागणी

उन्हाच्या तीव्रतेमुळे परिसरातील विहिरी, नाले व जलस्रोतांची भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालावलेली दिसून येत आहे. खासदार स्मिता वाघ व आमदार अनिल पाटील यांनी पांझरा नदीला अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

त्यानुसार जळगाव जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी धुळे येथील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून अमळनेर तालुक्यातील १६ गावांच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी किती पाणी सोडावे लागेल, याबाबत अहवाल पाठवून पाणी सोडण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT