Wakurde Irrigation Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Wakurde Irrigation Scheme : वाकुर्डे योजनेचे पाणी सुरू, तरी ‘मोरणे’ची पातळी वाढेना

Wakurde Scheme Water Issue : वाकुर्डे योजनेतील पाण्याचे करमजाई धरणातून ‘मोरणे’त आवर्तन सुरू होऊन सहा दिवस झाले, तरी धरणातील पातळी ‘जैसे थे’च असल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Sangli News : वाकुर्डे योजनेतील पाण्याचे करमजाई धरणातून ‘मोरणे’त आवर्तन सुरू होऊन सहा दिवस झाले, तरी धरणातील पातळी ‘जैसे थे’च असल्याचे चित्र आहे. जलाशयातून तात्पुरती उपसाबंदी करूनही पाणीसाठ्यात वाढ होत नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. करमजाई धरणाच्या सांडव्यातून पाणी न देता मुख्य दरवाजे उघडून सोडावे, अशी शेतकऱ्यांची आग्रहाची मागणी जोर धरत आहे.

शिराळा शहरानजीक असलेल्या मोरणा धरणावर पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी २० गावे, प्रामुख्याने शिराळा शहर व एमआयडीसी पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. धरणात पाणीसाठा वाढावा, म्हणून जलाशयातील पाण्याची पाटबंधारे विभागाने तात्पुरती उपसाबंदी केलेली आहे. जलाशयातील लाभधारक शेतकऱ्यांनी व महावितरणने सहकार्य केले असतानाही साठ्यात झपाट्याने वाढ होईल, ही अपेक्षा होती. मात्र सहा दिवस झाले तरी पाणी पातळी ‘जैसे थे’च आहे.

शिराळा, वाळवा व कऱ्हाड तालुक्यातील वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या हंगामात प्रथमच वारणा पाटबंधारे विभागाने पाणी सोडले आहे. सध्या करमजाई धरणामधून कऱ्हाड दक्षिणला ५० टक्के व मोरणा प्रकल्पात ५० टक्के पाणी सोडले जात आहे.

मात्र तीनपैकी एकच पंप सुरू असल्याने दोन्हीही विभागांकडे पुरेसे पाणी जात नाही. मोरणा धरणात सोडण्यात आलेले पाणी रस्त्यातच मोरणा नदी पात्रातच पाझरून धरणापर्यंत पोहोचत नसल्याची वस्तुस्थिती आहे. अद्याप अडीच महिने पाणी पुरवावे लागणार असल्यामुळे पाटबंधारे विभागापुढे मोठे आवाहन आहे.

सध्या मोरणा धरणात एक महिना पुरेलएवढाच साठा आहे. यामध्ये तीन आवर्तनेच होतील. पुढील अडीच महिने मोठी अडचण भासणार आहे. जानेवारीच्या सुरवातीपासून शेतकरी ‘वाकुर्डे’च्या पंपाचे वीज बिल भरायला तयार आहेत. केवळ ३० एम.सी.एफ.टी. पाणीसाठा असल्याने वाकुर्डे योजनेचे पाणी ‘मोरणा’काठच्या शेतकऱ्यांना तात्पुरते द्या, अशी आमची आग्रहाची मागणी होती. अद्याप एक थेंबही पाणी मिळालेले नाही.
सुखदेव पाटील, माजी सरपंच, बिऊर, ता. शिराळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जनतेने ८० वेळा नाकारलेले आज संसदेचे कामकाज बंद पाडतायतं' पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Inflation Control : वायदेबंदीमुळे महागाई नियंत्रणात बाधा?

Sharada Pawar : ‘लाडकी बहीण योजने’बाबत ‘मविआ’विरोधात खोटा प्रचार

Agriculture Commodity Market : तूर, हरभरा, कापसाच्या किमतीत घसरण

Cow milk Rate : गाय दूध खरेदी दरात ३ रुपयांची कपात, पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघाचा निर्णय

SCROLL FOR NEXT