Natural Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming : उत्‍पादनाच्या वाढीसाठी नैसर्गिक शेतीचा पर्याय

Team Agrowon

Murud News : रासायनिक कीटकनाशके, खतांच्या अति वापरामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. तसेच, जमिनीची सुपीकता कमी होत आहे. शेतजमिनीतील उपयुक्त जीवाणूंचा ऱ्हास होत असल्‍याने आता नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज असल्‍याचे मार्गदर्शन कृषी शास्‍त्रज्ञ डॉ. प्रमोद मांडवकर यांनी शेतकऱ्यांना केले.

रोह्यातील कृषी विज्ञान केंद्रातर्फे मुरूडमध्ये जैविक शेती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. राजेश मांजरेकर व कीडरोग वरिष्ठ शास्‍त्रज्ञ जीवन आरेकर, तसेच तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र सैदाणे व मुरूड जंजिरा कृषी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्रीधर जंजीरकर व कंपनीचे इतर सभासद उपस्थित होते.

निसर्गाचे आपण देणे लागतो, जे आपल्‍याला मिळाले आहे, ते निसर्गाला परत देणे आपली जबाबदारी आहे. बाहेरून रासायनिक कीटकनाशके व खते न आणता घरच्या घरी विविध प्रकारचे अर्क, स्थानिक/गावठी बियाण्यांचा वापर, पिकांचा फेरपालट, पिकांच्या अवशेषांचा वापर करून नैसर्गिक शेती करण्याचे आवाहन डॉ. राजेश मांजरेकर यांनी करीत नैसर्गिक शेतीचे तंत्र समजावून सांगितले.

कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांनी, सरकारच्या विविध योजना, त्याचप्रमाणे जैविक शेतीसाठी विशेष योजना डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजनेबाबत मार्गदर्शन केले.

जैविक शेतीमध्ये कीड नियंत्रण करताना विविध प्रकारचे अर्क जसे बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्काचा वापर करावा. त्याचप्रमाणे रस शोषणाऱ्या किडीसाठी पिवळ्या व हिरव्या रंगाचे चिकट सापळे, काही किडींचे पतंग अवस्थेत नियंत्रणासाठी प्रकाश सापळे, शेताच्या बांधावर झेंडू व मका यांसारख्या सापळा पिकांची लागवड करून नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण करावे.
- डॉ. जीवन आरेकर, वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ, कीडरोग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purchase off with Fertilizer Linking : ‘नाडा’च्या दणक्यानंतर कंपन्यांची लिंकिंगबाबत नरमाईची भूमिका

Rain Alert : पावसाचा जोर ओसरणार

Crop Damage Compensation : अमरावती जिल्ह्यातील एक लाखावर शेतकरी अर्थसाह्यासाठी पात्र

Crop Damage : पावसामुळे २४ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

Crop Damage : सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान

SCROLL FOR NEXT