Crop Damage : पावसामुळे २४ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

Heavy Rain Crop Loss : उत्तर सोलापूर तालुक्यात खरीप हंगामातील पिकांची सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील २४ हजार ७७५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Solapur News : उत्तर सोलापूर तालुक्यात खरीप हंगामातील पिकांची सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील २४ हजार ७७५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्तर तालुक्यात शेतकऱ्यात मोठे चिंतेचे वातावरण आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, मटकी, कांदा, मका आदी पिके घेतली जातात. सध्या सोयाबीन, मूग, मटकी आदी पिके काढणीला आली असताना सततच्या पावसाने मात्र पिकांचे नुकसान होत आहे. तसेच जमिनीतील ओल हटत नसल्याने कांद्याचे पीक ही पिवळे पडू लागले आहे.

Crop Damage
Crop Damage : तेहतीस हजार हेक्टरवरील पिकांना फटका

तूर, उडीद, मूग या पिकांची सरासरीपेक्षा १८२ टक्के पेरणी झाली आहे. भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांची १७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गळीत धान्य पिकांची पेरणीचे क्षेत्र यंदा पाचपटीने वाढले आहे.

यंदा मोठ्या उत्साहात पेरणीची टक्केवारी वाढली असली तरी सततच्या पावसामुळे पिकावर विरजण पडल्याचे चित्र आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले, बीबीदारफळ, अकोलेकाठी, वडाळा, कळमण, पडसाळी परिसरात रब्बी हंगामात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कांदा पेरणी व लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र पावसामुळे कांदे, सोयाबीन, पिके पिवळी पडून खराब होत आहेत.

Crop Damage
Crop Damage : अकोल्यातील शेतकऱ्यांसाठी १३ कोटींची मदत जाहीर

७२ तासांच्या आत नुकसानीची करा नोंद

सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असल्यास संबंधित विमाधारक शेतकऱ्यांनी त्वरित ७२ तासांच्या आत १४४४७ या टोल फ्री क्रमांकवर तक्रार नोंदवावी.

शेळगी मंडलात सर्वाधिक पाऊस

उत्तर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी १७८ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. २५ सप्टेंबरअखेर मंडलनिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे ः शेळगी (१६८ मिलिमीटर), तिर्हे (१२५ मिलिमीटर), मार्डी (१०३ मिलिमीटर), वडाळा (१३६ मिलिमीटर), सोलापूर (१४७ मिलिमीटर).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com