Tur, Sunflower Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Tur & Sunflower Crop : तूर, सूर्यफुलाच्या क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न गरजेचे

Agriculture University : कृषी विद्यापीठाने शिफरस केलेले विविध पिकांचे वाण, तंत्रज्ञान व अवजारांचा कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे विस्तार केला जाईल.

Team Agrowon

Pune News : ‘‘यंदा एल निनो आणि बिपॉरजॉय या चक्रीवादळांमुळे मॉन्सून लांबलेला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरीप पिकाचे कसे नियोजन करावे, तसेच राज्यात तूर आणि सूर्यफुलाचे क्षेत्र कमी होत असल्याने ते वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

कृषी विद्यापीठाने शिफरस केलेले विविध पिकांचे वाण, तंत्रज्ञान व अवजारांचा कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे विस्तार केला जाईल. कृषी विभाग हे कृषी विद्यापीठ आणि शेतकऱ्यांमधील दुवा असल्याने कृषी विभागाकडून विद्यापीठांना संपूर्ण सहकार्य केले जाईल,’’ असे आश्‍वासन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनू सभागृहामध्ये विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समिती खरीप- २०२३ च्या बैठकीचे आयोजन मंगळवारी (ता. १९) करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चव्हाण बोलत होते.

या वेळी अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील उपस्थित होते. तसेच संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, कृषी सहसंचालक सुनील बोरकर, विद्यापीठाचे कुलसचिव श्री विठ्ठल शिर्के आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी विद्यापीठांच्या संचालक, विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपक्रमाचे व तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले.

या वेळी बोलताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील म्हणाले, की महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापन झाल्यापासून विद्यापीठाने आतापर्यंत २९४ वाण, १७७४ कृषी तंत्रज्ञान शिफारशी व ४६ सुधारित अवजारे प्रसारित केली आहेत.

गेल्या वर्षी विद्यापीठाने चार वाण, ६९ शिफारशी व तीन सुधारित अवजारे प्रसारित केली आहेत. त्यामुळे कृषी विद्यापीठे ज्ञानाचा स्रोत आहे. हे ज्ञान कृषी विभागामार्फत विस्तारित केले जाते. कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग हे शेतकऱ्यांसाठी कायम कार्यशील आहे.

या बैठकीमध्ये गेल्या वर्षी मंजूर झालेल्या संशोधन शिफारशींचे प्रत्याभरण कृषी विभागाकडून मिळणे अपेक्षित आहे. तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी यावरही प्रत्याभरण कृषी विभागाकडून मिळणे गरजेचे आहे. या प्रत्याभरणावर (फिडबॅक) शेतकरीभिमुख संशोधनाची दिशा ठरवता येते.’’

कार्यक्रमात गणेशखिंड येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. रवींद्र बनसोड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे डॉ. मोहन शेटे यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. डी. बी. लाड यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drinking Water Management: पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा; अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे निर्देश

Farmer Welfare: दुष्काळग्रस्तांच्या विकासासाठी अंतरवाली सराटी दत्तक घेणार; पंकजा मुंडे यांची घोषणा

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचन पूर्वसंमतिपत्रे वाटपासाठी हालचाली

Book Review: म्हणी, वाक्‌प्रचारातून मोहरणारी मायबोली!

Emotional Marathi Story: बापाचं काळीज!

SCROLL FOR NEXT