Lumpy Skin Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Virus : पावसाळ्यासोबतच वाढला पुन्हा ‘लम्पी’ फेरा

Lumpy Skin Disease : गेल्या वर्षी पशुसंवर्धन विभागाच्या लसीकरणासह उपचार व इतर उपाययोजनांनी आटोक्यात आलेल्या लम्पीचा आजार पावसाळा सुरू होताच पुन्हा तोंड वर काढले आहे.

Team Agrowon

Beed News : गेल्या वर्षी गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी स्किन या संसर्गजन्य आजाराचा फैलाव झाला. बीड जिल्ह्यात या आजाराने आतापर्यंत ३० हजार ४८२ जनावरे बाधित झाली असून, २,११६ जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या लसीकरणासह उपचार व इतर उपाययोजनांनी आटोक्यात आलेल्या हा आजाराने पावसाळा सुरू होताच पुन्हा तोंड वर काढले आहे.

पावसाळ्यात किटक आळ्यांची संख्या वाढली आणि या आळ्यांच्या चाव्याने चांगल्या जनावरांना व त्यांच्यापासून इतर जनावरांना लम्पीची बाधा झाली. एप्रिलपासून पुन्हा जिल्हाभरातील ४७ गावांमध्ये गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी या आजाराचा उद्रेक झाला आहे. मात्र, या आजारावर नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाने लसीकरणासह विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी शुक्रवारी (ता. १८) लसीकरण मोहिमेला विविध ठिकाणी भेटी दिल्या.

दरम्यान, एप्रिलनंतर जिल्ह्यातील ४७ गावांमधील दोन हजारांहून अधिक जनावरांना लम्पी आजाराची बाधा झाली आहे. तर, उपचारानंतर १,३८८ जनावरे बरी झाली आहेत.

दगावलेल्या जनावरांची भरपाई मिळेना

लम्पी आजाराने मृत्यू झालेल्या गाईसाठी ३० हजार रुपये तर बैलासाठी २५ हजार आणि वासरासाठी १६ हजार रुपयांपर्यंत भरपाई शासनाकडून पशुपालकांना दिली जाते. आतापर्यंत २,११६ जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. यात आतापर्यंत १,८५१ जनावरांच्या मालकांना भरपाई मिळाली आहे. मात्र, २६५ जनावरांच्या मालकांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT