Fertilizers Linking Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizers Linking : कंपन्यांकडून खते, बियाण्यांची लिंकिंग विरोधात फुंडकरांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Akash Fundkar : झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी आवश्यक निविष्ठा व इतर बाबींबाबत मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना दिले.

Team Agrowon

Akola : अकोला जिल्ह्यात बी-बियाणे व खतांच्या कंपन्या कृषी केंद्रांना विक्री करीत असताना लिंकिंग करून खते व बी-बियाण्यांची विक्री करीत असल्याने कारवाईची मागणी कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

त्याची दखल घेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अशा प्रकारे लिंकिंग होत असल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील’ असा स्पष्ट इशारा राज्यस्तरीय खरीप बैठकीत दिला आहे. पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी शनिवारी (ता.१७) जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत खरीप नियोजनाचा आढावा घेतला होता.

झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी आवश्यक निविष्ठा व इतर बाबींबाबत मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना दिले. त्यानुसार निविष्ठांच्या सुरळीत पुरवठ्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय बैठकीत दिले आहेत. खरीप हंगामात सोयाबीन व कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कपाशीच्या काही वाणांचा पुरवठा करण्याची मागणी ही पालकमंत्र्यांनी निवेदनाद्वारे केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT