Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तूर्तास टळला?

Cabinet Meeting News : त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंगळवारी (ता.२९) कोकाटे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचं जाहीर केलं. त्यामुळे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीच्या पूर्वी कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

Dhananjay Sanap

Ajit Pawar : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा तूर्तास टळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. वारंवार वादग्रस्त विधान आणि विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळण्याच्या प्रकारामुळे कृषिमंत्री कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. परंतु त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंगळवारी (ता.२९) कोकाटे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचं जाहीर केलं. त्यामुळे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीच्या पूर्वी कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

परंतु मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी कृषिमंत्र्यांचे चांगलेच कान टोचले असून कृषिमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची चर्चा आहे. त्यामुळे तूर्तास तरी कृषिमंत्र्यांच्या राजिनाम्यावर पडदा पडल्याचं दिसतंय.

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री कोकाटे यांच्यात दीड तास बैठक झाली. परंतु या बैठकीनंतर माध्यमांना काहीही माहिती न देता कोकाटे बैठकीला निघून गेले. त्यामुळे कोकाटे यांचा राजीनामा तूर्तास घेणं, उपमुख्यमंत्री पवारांनी टाळल्याचं सांगितलं जात आहे.

याच बैठकीत कृषिमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करून भविष्यात अशी वक्तव्ये करणार नाही, अशी हमी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिली आहे. त्यामुळे राज्याच्या कृषिमंत्री पदावर कोकाटे कायम राहतील, अशी संकेत मिळत आहेत.

एक रुपया भिकारी घेत नाही, 'कृषी खातं म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी, शेतकरी कर्जमाफीच्या पैशात मोठी लग्न करतात, ढेकळाचे पंचनामे करायचे का, या वादग्रस्त विधानांमुळे कृषिमंत्री कोकाटे चर्चेत राहिले आहेत. परंतु कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुती सरकारला टीकाचे धनी व्हावे लागले आहे.

त्यातच पावसाळी अधिवेशनात विधीमंडळात ऑनलाईन रमी खेळत असतानाचा कृषिमंत्र्यांचा व्हिडीओ समोर आल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर शेतकऱ्यांमध्ये कृषिमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे संतापाची भावना निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. तर या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याने कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल, या चर्चेला उधाण आलं.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाची पहिलीच बैठकी मंगळवारी होत आहे. त्यामुळे या बैठकीत कृषिमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांवरून चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT