Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांना 'शक्तिपीठ'सारखे महामार्ग उद्ध्वस्त करत आहेत; अजित नवलेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ‘शक्तिपीठ’सारखे महामार्ग प्रकल्प, शेती व शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून रेटू पाहत आहेत.

sandeep Shirguppe

Ajit Navale criticizes Chief Minister : राज्यात भाजपचे देणगीदार, कॉर्पोरेट भागीदार व ठेकेदारांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ‘शक्तिपीठ’सारखे महामार्ग प्रकल्प, शेती व शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून रेटू पाहत आहेत, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्य सचिव मंडळ सदस्य डॉ. अजित नवले यांनी केला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या १५ व्या सांगली जिल्हा अधिवेशनात मंगळवारी(ता.२८) बोलत होते. मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनात झालेल्या अधिवेशनास पक्षाचे किसन गुजर मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. सुनील मालुसरे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

डॉ. नवले म्हणाले, ‘‘देश, राज्यात सत्तेवर असलेल्या शक्ती देशातील लोकशाही, संविधान व धर्मनिरपेक्षता, एकजूट नष्ट करू पाहत आहेत. कॉर्पोरेट शोषणाविरोधात संघटित होऊ पाहणाऱ्या शेतकरी, कामगार, शेतमजूर, श्रमिक जनतेत फूट पाडण्यासाठी व धर्मांध, मनुवादी अजेंडा पुढे रेटण्यासाठी धर्म व जातीचा गैरवापर करत आहे. सोयाबीन, दूध, कापूस, शेतीमालाचे भाव सरकारच्या हस्तक्षेपाने पाडले जात आहेत. कामगार व योजना कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला नाकारला जात आहे.’’ अशी टीका नवले मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली.

सुनील मालुसरे म्हणाले, ‘‘माकप जिल्हा अधिवेशनानिमित्त सरकारच्या धोरणांविरोधात संघर्षाची जोरदार तयारी करत आहे. जनतेने संघर्षात सामील व्हावे.’’ जिल्हा सचिव रेहाना शेख यांनी अहवाल मांडला. अहवालावर उपस्थित पक्षसभासदांनी चर्चा केली.

शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, महिला अत्याचाराविरोधात सरकारने कडक पावले उचलावीत, असे ठराव अधिवेशनात मांडण्यात आले. अहवाल, ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. पुढील तीन वर्षांसाठी नवीन १७ जणांची कमिटी निवडण्यात आली. जिल्ह्याचे सरचिटणीस म्हणून रेहाना शेख यांची निवड झाली. ॲड. सुधीर गावडे यांनी आभार मानले.

सांगली जिल्ह्यातील ‘या’ गावांतून जाणार शक्तिपीठ

आटपाडी तालुका : शेटफळे, कवठेमहांकाळ तालुका : घाटनांद्रे, तिसंगी, तासगाव तालुका : डोंगरसोनी, सावळज, सिद्धेवाडी, अंजनी, वज्रचौंडी, मणेराजुरी, गवाण, सावर्डे, मतकुणकी, नागाव कवठे. मिरज तालुका : कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी. या भागातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. यामध्ये २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत सांगली जिल्ह्यातील ९० टक्के गावांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात ठराव केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT