Farmer Producer Company Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Producer Company : चौदा शेतकरी कंपन्या स्थापण्याचे उद्दिष्ट

Farmer Company : मूल्यसाखळी विकास यासाठी विशेष कृती योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षांसाठी परभणी जिल्ह्यात १४ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे.

Team Agrowon

Parbhani News : राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ, मूल्यसाखळी विकास यासाठी विशेष कृती योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षांसाठी परभणी जिल्ह्यात १४ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी १ लाख रुपये अनुदानाची तरतूद आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हरणे यांनी दिली.

कंपनीच्या पायाभूत सुविधा निर्मितीसाठी त्यात गोदाम बांधकामासाठी खर्चाच्या ५० टक्के किंवा किमान २५ लाख रुपये, क्लीनिंग व ग्रेडिंग युनिटसाठी खर्चाच्या ५० टक्के किंवा किमान ९ लाख रुपये, सायलोसाठी खर्चाच्या ५० टक्के किंवा किमान ७५ लाख रुपये अनुदानाची तरतूद आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मूल्यसाखळी बळकटीकरणासाठी प्रोत्साहनपर १ लाख रुपये अनुदान आहे. बीज प्रक्रिया युनिटसाठी खर्चाच्या ५० टक्के किंवा ५० हजार रुपये अनुदानाची तरतूद आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर जैविक निविष्ठा निर्मिती घटकाअंतर्गत मास्टर लॅब निर्मितीसाठी प्रतिलॅब खर्चाच्या ५० टक्के किंवा किमान १ लाख रुपये, बेसिक लॅब निर्मितीसाठी किमान १५ हजार रुपये, तेलघाणा प्रक्रिया युनिटसाठी किमान २ लाख रुपये तरतूद आहे. या योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी एकूण ४ कोटी ७ लाख ७२ हजार रुपये एवढी आर्थिक तरतूद आहे.

या योजनेअंतर्गत सोयाबीन पीक प्रात्यक्षिकांसाठी १४० शेतकरी समूहांतर्गत १४ हजार हेक्टरचा लक्ष्यांक आहे. पीक प्रात्यक्षिके, शेतीशाळा व्यतिरिक्त बियाणे साखळी बळकटीकरण, मूल्यसाखळी विकास व प्रचलित योजनांची सांगड हे घटक या बाबींच्या मार्गदर्शक सूचना व लक्ष्यांक प्राप्त झालेला आहे, अशी माहिती हरणे यांनी दिली.

सोयाबीन मूल्यसाखळी योजना तालुकानिहाय उद्दिष्ट (क्षेत्र हेक्टर, आर्थिक तरतूद लाख रुपये)

तालुका शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी समूह प्रात्यक्षिक क्षेत्र आर्थिक तरतूद

परभणी १ १० १००० ४४.३००

जिंतूर २ २० २००० ५४.४५०

सेलू २ २० २००० ५३.८००

मानवत २ २० २००० ५४.४५०

पाथरी १ १० १००० ४४.१५०

सोनपेठ २ २० २००० ५४.४५०

गंगाखेड २ -- २००० ५४.९५०

पालम १ १० १००० १९.१५०

पूर्णा १ १० १००० १९.३००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT