AI In Sugarcane Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

AI In Sugarcane Farming : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापराने ऊसशेती फायदेशीर

Sugarcane Production : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आलो आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने ४० टक्के उत्पन्न वाढ तर, ३० टक्के उत्पादन खर्चात बचत झाल्याचे सिद्ध झाले आहे.

Team Agrowon

Sangli News : विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ऊसशेती क्षेत्रात सुरू झाला असून, फायदेशीर व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनीही बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले.

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्यात अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र व नेटाफिम कंपनीच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान व भविष्यातील ऊस शेती विषयावर ‘स्मार्ट शेतकरी संमेलन’ पार पडले. या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-सरुडकर प्रमुख उपस्थित होते.

अध्यक्ष नाईक म्हणाले, की ‘विश्वास’ कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांच्या प्रगतीचा व हिताचा विचार जपला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आलो आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने ४० टक्के उत्पन्न वाढ तर, ३० टक्के उत्पादन खर्चात बचत झाल्याचे सिद्ध झाले आहे. ऊस शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर फायदा देणारा आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी समूह शेतीचा प्रयोग राबविण्याचा विचार संचालक मंडळ करत आहे.

‘नेटाफिम’चे कृषितज्ज्ञ अरुण देशमुख म्हणाले, की शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा. त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची जोड द्यावी. निश्चित ऊस शेतीमध्ये त्याचा फायदा अपेक्षित आहे. हुकमी पीक म्हणून ऊस शेतीकडे पाहिले जाते. दर तीन वर्षांनी ऊस बियाणे बदलणे गरजेचे आहे. ऊस शेतकऱ्यांना सुखी व समृद्ध करण्याची ताकद ठिबक सिंचन व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान प्रणाली आहे.

बारामतीचे कृषितज्ज्ञ डॉ. संतोष देशमुख म्हणाले, की ऊसशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीत कशाची आवश्यकता आहे, याची नेमकी माहिती या तंत्रज्ञानाच्या वापरातून मिळते. पिकांस सर्व गोष्टी समतोल प्रमाणात मिळून ऊसशेती फायदेशीर होते. बारामती येथील प्रयोगात एकरी १५० टनांपर्यंत उसाचे उत्पादन मिळाले आहे.

प्रास्ताविकात विराज नाईक म्हणाले, की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वैद्यकीय व वाहननिर्मिती क्षेत्रानंतर आता शेती क्षेत्रात होत आहे. हे तंत्रज्ञान ऊस शेतीसाठी फायदेशीर आहे. कार्यकारी संचालक अमोल पाटील, कारखान्याचे आजी, माजी संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अनेक गावचे आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सोसायट्यांचे पदाधिकारी, कारखान्यातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT