AI Agriculture Project Baramati Agrowon
ॲग्रो विशेष

AI In Sugarcane Farming : ऊस शेतीत ‘एआय’ वापरासाठी तमिळनाडूचा पुढाकार

AI Agriculture Project Baramati : तमिळनाडू राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रक्षेत्रावर व निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आधारित ऊस शेती प्रकल्प राबविला जाणार आहे.

Team Agrowon

Baramati News : तमिळनाडू राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रक्षेत्रावर व निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आधारित ऊस शेती प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पाच्या समन्वयाची जबाबदारी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (एडीटी), बारामती पार पाडणार आहे.

तमिळनाडूतील नामांकित साखर कारखान्यांच्या पुढाकाराने चेन्नई येथे रविवारी (ता. ८) आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात एडीटीच्या ए.आय. आधारित ऊस शेती प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीला ११ साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि ऊस विकास अधिकारी उपस्थित होते.

एडीटी गेल्या चार वर्षांपासून ऑक्सफर्ड विद्यापीठ व मायक्रोसॉफ्ट यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात ‘ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ हा प्रकल्प राबवत आहे. त्याला मिळालेल्या उल्लेखनीय यशानंतर आता इतर राज्यांत देखील हा प्रकल्प राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेचे विश्‍वस्त प्रतापराव पवार, बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे व डॉ. योगेश फाटके, तसेच ‘मॅप माय क्रॉप’चे प्रतिनिधी राजेश शिरोळे व डॉ. भूषण गोसावी यांनी चेन्नई येथे झालेल्या कार्यक्रमात या प्रकल्पाची माहिती दिली.

हा प्रकल्प तमिळनाडूमध्ये राबविण्यासंदर्भात या वेळी चर्चा झाली. प्रकल्पात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे, साखर कारखान्यांमार्फत प्रकल्पाला चालना देणे, भविष्यात शासकीय योजनांमार्फत प्रकल्पाचे विस्तारीकरण करणे इत्यादी मुद्यांचा त्यात समावेश होता.

तमिळनाडूतील ऊस उत्पादक शेतकरी सध्या विविध समस्यांना तोंड देत आहेत. जमिनीची ढासाळलेली सुपीकता, पाण्याचा व खतांचा अतिरिक्त वापर, वातावरणातील बदलांचा ऊस पिकाच्या वाढीवर होणारा प्रतिकूल परिणाम, लागवड क्षेत्रातील घट यामुळे साखर उद्योगासमोर आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे. ए.आय. आधारित ऊस शेतीमुळे त्यावर तोडगा निघणे शक्य आहे, असा सूर या वेळी व्यक्त करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; उन्हाचा चटका वाढला

Farmers Await Compensation: केळी, कांदा नुकसानीची भरपाई कधी मिळणार?

Nandurbar Water Storage: नंदुरबारात अनेक बंधारे, जलसाठे मुबलक

Sugar Industry: साखर उद्योग अडचणीत, समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी सरकारकडून समिती गठित

Groundnut Procurement: जामोदमध्ये उघड लिलाव पद्धतीने भुईमूग खरेदी सुरू

SCROLL FOR NEXT