Voting Update Agrowon
ॲग्रो विशेष

Highest Voter Turnout : अहिल्यानगरला सर्वाधिक मतदान करणाऱ्या तेरा गावांचा सन्मान

Maharashtra Assembly Election : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये सर्वाधिक मतदान केलेल्या जिल्ह्यातील गावांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Team Agrowon

Ahilyanagar News : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये सर्वाधिक मतदान केलेल्या जिल्ह्यातील गावांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये शिर्डी विधानसभा मतदार संघातील तरसवाडी या गावाला सर्वाधिक ९५ टक्के मतदानाबद्दल जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या निवडणुकीत चांगले काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही या वेळी गौरव करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान करणाऱ्या गावांचा तसेच प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी व विद्यालयाचाही गौरव करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार शनिवारी (ता. २५) राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात गौरव सोहळा झाला. त्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, अरुण उंडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, मिलिंद वाघ, गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव डॉ. किरण मोघे, सदस्य महेश देशपांडे, आनंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा पोखरकर, मतदारदूत डॉ. अमोल बागुल, सखाराम मेहेत्रे विद्यालयाच्या शिक्षिका मनीषा कदम, मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक संजय शिंदे, प्रशांत सुरसे व नंदकुमार नेमाणे यांचा गौरव करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीत नवमतदार नोंदणी आणि स्वीप उपक्रमात चांगली कामगिरी करणाऱ्या संगमनेर येथील संगमनेर नगरपालिका कला, दामोदर जगन्नाथ मालपाणी वाणिज्य आणि बी. एन. सारडा महाविद्यालय, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय, लोणी, एस. एस. जी. एम. कॉलेज, कोपरगाव, रा. ब. नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई, बाळासाहेब भारदे महाविद्यालय, शेवगाव, लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय, राहुरी, न्यू आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, पारनेर, न्यू आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, अहिल्यानगर, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा, या महाविद्यालयांचा गौरव करण्यात आला.

गावे सन्मानित

तरसवाडी व खडकेवाके (शिर्डी) घाटघर (अकोले) गोडसेवाडी (संगमनेर), हिंगणी (कोपरगाव), दिघी (श्रीरामपूर), मुरुमे (नेवासा), विजयपूर (शेवगाव-पाथर्डी), मल्हारवाडी (राहुरी), गाडीलगाव (पारनेर), बोल्हेगाव (अहिल्यानगर शहर), गार (श्रीगोंदा), कोरेगाव (कर्जत-जामखेड).

लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असून मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत अधिक मतदान झालेल्या गावांनी इतर गावांनाही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानासाठी प्रोत्साहित करावे.
- सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी, अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सततच्या पावसाने ऊस पीक धोक्यात

Crop Damage Survey : सांगली जिल्ह्यातील दीड हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

Water Project Storage : सातपुड्यातील प्रकल्प भरू लागले

Bajari Sowing : खानदेशात बाजरी पीक जोमात

Crop Insurance : शेतकऱ्यांना मिळणार १२७ कोटींची भरपाई

SCROLL FOR NEXT