Agri Expo 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Issues : शेतीमालाला हमीभाव, मजूर समस्या, वीजपुरवठ्याचे प्रश्‍न सुटणार कधी?

Farmers' Reaction : ‘अॅग्री एक्स्पो-२५’ हे कृषी प्रदर्शन छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे. मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या विविध जिल्ह्यांतून शेतकरी प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत. यानिमित्ताने शेतकऱ्यांनी ‘अॅग्रोवन’शी संवाद साधला.

सुदर्शन सुतार

Chhatrapati Sambhajinagar News : ‘अॅग्री एक्स्पो-२५’ हे कृषी प्रदर्शन छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे. मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या विविध जिल्ह्यांतून शेतकरी प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत. यानिमित्ताने शेतकऱ्यांनी ‘अॅग्रोवन’शी संवाद साधला.

आले, मिरची, टोमॅटो या पिकांवर सड रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी, पीक सडून जात आहे. त्यामुळे तीन एकरांमधील आले (अद्रक) पीक पूर्णपणे बसून गेले आहे. यावर उपाय मिळत नसल्याने मोठे नुकसान होत आहे. याबाबत कृषी शास्त्रज्ञ, संस्थांनी उपाय शोधून मार्गदर्शन केले पाहिजे.
मच्छिंद्र राजाराम गायकवाड, नायगाव (ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर)
कृषिपंपासाठी वीजजोड मिळत नाही, शिवाय मिळणारी वीजही अनियमित मिळते. मी दोन वर्षांपूर्वी कोटेशन भरणा केले. अद्यापही वीजजोड मिळाले नाही.
दत्ता दामोदर काळे, रांजणगाव (ता. पैठण)
शेतीत उत्पादन खर्च अधिक होत असल्याने दराअभावी फारसे शिल्लक राहत नाही. शेतीमालाच्या हमीभावाबाबत ठोस निर्णय व्हायला हवा. ‘अॅग्रोवन’च्या या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळत आहे.
रविकांत बालाजी जाधव, कुर्तडी (ता. कळमनुरी, जि. हिंगोली)
सोयाबीनचे हमीभाव केंद्र बारदाना नसल्याने बंद आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात कमी दराने विक्री करावी लागत आहे. ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनात चांगली माहिती मिळत आहे.
रमेश राम नारायण बाहेती, मोटेवाडी (ता. माजलगाव, जि. बीड)
पहिल्यांदा सात एकरांवर उसाचे पीक घेतले. क्षेत्र कमी असल्याने ऊस कारखान्याला जाईल. त्यातही मजुरांचा प्रश्न असल्याने हार्वेस्टरचे तंत्रज्ञान पुढे आले, पण त्यातही लूट होते.
संपत दगडूबा डुकरे, मनूर (ता. माजलगाव, जि. बीड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT