Crop Damage In Nashik  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage In Nashik : इगतपुरी, सिन्नर, निफाडमध्ये शेतीची वाताहत

नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी, सिन्नर आणि निफाड तालुक्यांना मंगळवारी (ता. ११) सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने झोडपले.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी, सिन्नर आणि निफाड तालुक्यांना मंगळवारी (ता. ११) सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने झोडपले. वादळी वारा आणि विजांसह सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या या पावसाने निफाडच्या द्राक्ष पट्ट्यात अक्षरशः दाणादाण उडविली आहे.

काढणी सुरू असलेल्या, दर ठरलेल्या द्राक्षबागा अक्षरशः आडव्या होत असताना पाहण्याशिवाय शेतकरीसमोर पर्यायच राहिला नाही. आता पंचनामे करा पण हेक्टरी सरसकट किमान खर्च आणि कर्ज तरी फिटेल एवढी मदत मायबाप सरकारने द्यावी, असे आर्जव उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाने केले आहे.

जिल्ह्यात सिन्नर, इगतपुरी आणि निफाड तालुक्यांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. नुकसानीतून सावरत शेतकरी उरलासुरला माल काढून तो घरात नेण्याची तयारी करत असताना अचानक आलेल्या या पावसाने कांदा शेतातच भिजला. तर वाऱ्यामुळे द्राक्षबागा आडव्या झाल्या.

निफाड तालुक्यात सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा वादळी पावसाने झोडपून काढले. द्राक्षासह काढणीस आलेला गहू, साठवणूक केलेला कांदा यांना मोठा फटका बसला आहे.

चांदोरी, पिंपळस, निफाड, रौळस पिंपरी, उगाव, शिवरे माळसाकोरे करंजगाव, शिंगवे, मांजरगाव, निफाड नैताळेसह गोदाकाठ भागात जोरदार वादळी पावसाने द्राक्षबागांची हानी झाली.

इगतपुरी पूर्व भागातील टाकेद परिसरासह तालुक्याच्या विविध भागांत मंगळवारी (ता. ११) सलग तिसऱ्या दिवशी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली.

पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. सिन्नर तालुक्यात सायंकाळी तासभर वादळी वारा व पावसाने हाहाकार उडाला. पूर्व व पश्चिम भागांतील अनेक गावांत तडाखा दिला. कांदा, टोमॅटो, काकडी पीक पूर्ण उद्ध्वस्त झाले.

पेठ तालुक्यात साडेतेरा हजार कोंबड्या मृत

वादळी वाऱ्यामुळे पेठ तालुक्यात बर्डापाडा (गावंध) येथील ज्ञानेश्वर जयराम भोये यांच्या पोल्ट्रीचे नुकसान झाले. त्यात असलेले ९.५ हजार ब्रॉयलर पक्षी आणि शेतकरी मंगशे चंदर ईपाळ यांच्या शेडमधील साडे चार हजार ४.५ हजार पक्षी जागीच मरण पावले.

या दोन्ही तरुण शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यांसह भाजीपाला पिकांचे मंडप काही ठिकाणी पडले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT