Krushived 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Technology Festival : सगरोळीत उद्यापासून कृषी तंत्रज्ञान महोत्सव

Krushived 2024 : सगरोळी कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या वतीने बुधवार (ता.७) ते शुक्रवार (ता.९) दरम्यान सगरोळी (ता. बिलोली) येथे कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Nanded News : सगरोळी कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या वतीने बुधवार (ता.७) ते शुक्रवार (ता.९) दरम्यान सगरोळी (ता. बिलोली) येथे कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पीक प्रात्याक्षिके, कृषी क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान, कृषी प्रदर्शन, कृषी यांत्रिकीकरण, पीक परिसंवाद, महिला मेळावा, खाद्य महोत्सव, नावीन्यपूर्ण कृषी प्रकल्प स्पर्धा, पीक प्रात्याक्षिके, प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी (ता.७) सकाळी ११ वाजता परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे डॉ. सुब्रतकुमार रॉय,

कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. धर्मराज गोखले, रिलायन्स फाउंडेशनचे राज्य प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र चौधरी, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. दिलीप पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दिलीप दमय्यावार उपस्थित राहणार आहेत.

महिल्या दिवशी ज्वारी संशोधन केंद्राचे डॉ. प्रीतम मुंदडा, गणपती पवार मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवारी (ता.८) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उमेद अभियानचे गजानन पातेवार, माविमचे अनंत खेत्री उपस्थित राहणार आहेत. मानव विकासतज्ज्ञ विशाला पटनम, कृषीकन्या श्रद्धा ढवन ढोरमले या दुग्ध व्यवसायातील संधी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

शुक्रवारी (ता.९) डॉ. दिलीप पाटील हे दादा लाड व अतिघन कापूस लागवड तंत्रज्ञान तर डॉ. आनंद गोरे नैसर्गिक व सेंद्रिय शेती पद्धती याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्धाटन

उद्या, बुधवारी (ता.७) रोजी उद्घाटनासाठी ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन व खासदार प्रताप पाटील चिखलीकर, तर दुसऱ्या दिवशी महिला मेळाव्याकरिता भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ, प्रणिता चिखलीकर, मीनल खतगावकर, पूनम राजेश पवार व समारोपासाठी कृषिमंत्री धनंजय मुंढे यांना निमंत्रित केल्याचे कळविण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT