Agriculture Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing : परभणी, हिंगोलीत पेरण्या खोळंबल्या

Agriculture Update : दोन जिल्ह्यांतील ३७ मंडलांत १०० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यात १० मंडलांमध्ये ५० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत पावसाने ओढ दिली आहे. तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. शुक्रवार (ता. २१)पर्यंत या दोन जिल्ह्यांतील ३७ मंडलांत १०० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यात १० मंडलांमध्ये ५० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परिणामी, खरिपाच्या पेरण्या रखडल्या असून पाणीटंचाई कायम आहे. कमी ओलाव्यामुळे उगवण व्यवस्थित होत नाही. अनेक भागांत दुबार पेरणीचे सावट आहे.

परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. २१)पर्यंत सरासरी १०१.७ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १२३.५ मिमी (१२१.४ टक्के) पाऊस झाला. परंतु जिल्ह्यातील ५२ पैकी १६ मंडलांमध्ये १०० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात ३ मंडले ५०

मिमीपेक्षा कमी पावसाची आहेत. परभणी तालुक्यात सरासरी १३८.६ मिमी तरजिंतूर तालुक्यात सरासरी १०५.७ मिमी, सेलू तालुक्यात सरासरी ११६.९ मिमी, मानवत तालुक्यात सरासरी १७४.७ मिमी, पाथरी तालुक्यात सरासरी १६४.२ मिमी, सोनपेठ तालुक्यात सरासरी ११९.३ मिमी, गंगाखेड तालुक्यात सरासरी १३२.७ मिमी, पालम तालुक्यात सरासरी ९०.३ मिमी, पूर्णा तालुक्यात सरासरी ८५ मिमी पाऊस झाला जिल्ह्यातील पिंगळी, पेठशिवणी, कावलगाव या ३ मंडलांत ५० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

१०० मिमीपेक्षा कमी पाऊस झालेल्या मंडलात परभणी तालुक्यातील ९ पैकी ३ मंडले, जिंतूर तालुक्यातील ८ पैकी ३ मंडले, सेलू तालुक्यातील ६ पैकी १ मंडल, सोनपेठ तालुक्यातील ४ पैकी १ मंडल, गंगाखेड तालुक्यातील ५ पैकी १ मंडल, पालम तालुक्यातील ५ पैकी ३ मंडले, पूर्णा तालुक्यातील ६ पैकी ४ मंडले मिळून एकूण १६ मंडलांचा समावेश आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २१ मंडलांमध्ये १०० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात शुक्रवार (ता. २१)पर्यंत सरासरी ११८.४ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८५.२ मिमी (७२ टक्के) पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी,

वसमत, सेनगाव या ४ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी तर औंढा नागनाथ तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. हिंगोली तालुक्यात सरासरी ९८.५ मिमी पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यात सरासरी ९९.९ मिमी, वसमत तालुक्यात सरासरी ६०.५ मिमी, औंढा नागनाथ तालुक्यात सरासरी १०.६.९ मिमी, सेनगाव तालुक्यात सरासरी ७०.४ मिमी पाऊस झाला.

खंबाळा, डोंगरकडा, वारंगा, आंबा, गिरगाव, कुरुंदा, आजेगाव या ७ मंडलांत ५० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला. १०० मिमीपेक्षा कमी पाऊस झालेल्या मंडलात हिंगोली तालुक्यातील ७ पैकी ३ कळमनुरी तालुक्यातील ६ पैकी ३ मंडले, वसमत तालुक्यातील ७ पैकी ६ मंडले, औंढा नागनाथ तालुक्यातील ४ पैकी ३ मंडले, सेनगाव तालुक्यातील सर्व ६ मंडले मिळून एकूण २१ मंडलांचा समावेश आहे.

१०० मिमी पेक्षा कमी पाऊस झालेली मंडले

(ता.२१) शुक्रवार पर्यंत)

परभणी जिल्हा : परभणी ग्रामीण ७४.८, सिंगणापूर ९०.४, पिंगळी ४७, सावंगी म्हाळसा ९६, बामणी ९७.१, चारठाणा ६६.५, वालूर ७६.८, आवलगाव ९८.७, गंगाखेड८१, पालम ८६.४, चाटोरी ६५.८, पेठशिवणी ४८.२, पूर्णा ७१.८, लिमला ८१.१, कात्नेश्वर ९६.६, कावलगाव ३८.८.

हिंगोली जिल्हा : नरसी नामदेव ७५.७, सिरसम ९६.१, खंबाळा ४७.२, आखाडा बाळापूर ७७.२, डोंगरकडा ३९, वारंगा ४९.५, वसमत ८२.३, आंबा ३९.२, हयातनगर ५८.७, गिरगाव ३७.३, टेंभुर्णी ६८.५, कुरुंदा ३१.७, औंढनागनाथ ९६.८, येळेगाव ९३.४, साळणा ७९.७, सेनगाव ७८, गोरेगाव ५५.२, आजेगाव ६३.९, साखरा ७७.६, पानकन्हेरगाव ७९.७, हत्ता ६७.७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidarbha Heat Wave: विदर्भातील तीन जिल्ह्यांत अति उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Banana Variety Selection: कमी पावसातील लागवडीसाठी केळीचा कंद निवडताना काय तपासावे?

Cotton Cultivation: अकोल्यात कपाशीच्या लागवडीत वाढीची शक्यता

Online RTI Portal: क्षेत्रीय कार्यालयांतही ऑनलाइन माहिती अधिकार

Petrol Diesel Shortage: पेट्रोल- डिझेलचा साठा, मग पंपांवर रांगा का?; मुख्यमंत्री फडणवीसांनी खरं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT