Prime Minister Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Development : सूक्ष्म नियोजन करून कृषी क्षेत्र मजबूत केले

PM Narendra Modi : केंद्र सरकारने शेतीपासून बाजारापर्यंतचे सूक्ष्म नियोजन करून कृषी क्षेत्र मजबूत केले आहे.

Team Agrowon

New Delhi : केंद्र सरकारने शेतीपासून बाजारापर्यंतचे सूक्ष्म नियोजन करून कृषी क्षेत्र मजबूत केले आहे. तसेच ‘यूपीए’ सरकारच्या काळात कर्जमाफीचे केवळ ३ कोटी शेतकरी लाभार्थी होते. तर ‘एनडीए’ सरकारच्या पीएम किसान योजनेचा आता दहा कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

त्याचबरोबर शेतकरी, गरीब, महिलाशक्ती आणि तरुण हे चार स्तंभ मजबूत करण्यासाठी भारताच्या विकासाच्या प्रवासात या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान मोदी राज्यसभेत बुधवारी (ता. ३) बोलताना म्हणाले.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला राज्यसभेत पंतप्रधान मोदी यांनी सविस्तर उत्तर दिले.

कृषी आणि शेतकऱ्यांसाठी सदस्यांनी दिलेल्या सूचनांबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच पंतप्रधानांनी गेल्या १० वर्षांत शेतकऱ्यांसाठी शेती फायदेशीर करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली. कर्ज, बियाणे, परवडणारी खते, पीकविमा, एमएसपी वाढविल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आम्ही प्रत्येक टप्प्यावर सूक्ष्म नियोजनाद्वारे बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांना एक मजबूत व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, की किसान क्रेडिट कार्डाद्वारे लहान शेतकऱ्यांसाठी कर्ज मिळविण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. किसान क्रेडिट कार्डाचा लाभ मच्छीमार आणि पशुपालकांनाही देण्यात आला आहे. पंतप्रधानांनी लहान शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आणि पंतप्रधान किसान सन्मान निधीचा उल्लेख केला. ज्याद्वारे गेल्या ६ वर्षांत सुमारे ३ लाख कोटी रुपये वितरित करून १० कोटी शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. पंतप्रधानांनी पूर्वीच्या राजवटीत कर्जमाफी योजनांची पूर्तता आणि विश्‍वासार्हता याकडे लक्ष वेधले, तसेच आताच्या सरकारमध्ये अधिक लाभ मिळत असल्याचेही सांगितले.

महिला ड्रोन उडविताना पाहून समाधान

पंतप्रधान मोदी यांनी आशा व्यक्त केली की प्रत्येक नवीन क्षेत्रात महिलांनी नेतृत्व करावे. प्रत्येक नवीन तंत्रज्ञान प्रथम महिलांपर्यंत पोहोचावे यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्नशील आहे. आज नमो ड्रोन दीदी अभियान खेड्यापाड्यात यशस्वीपणे राबविण्यात आले असून, त्यात महिला आघाडीवर आहेत, असेही ते म्हणाले. ड्रोन चालविणाऱ्या महिलांना ‘पायलट दीदी’ असे संबोधले जात होते आणि अशा प्रकारची ओळख ही महिलांसाठी प्रेरणादायी आहे. आज महिला ड्रोन चालवून पैसा कमवित आहे, हे दृश्य मला खूप समाधान देणारे असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT