Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

Organic Certification : या वनस्पतीला पूर्णतः सेंद्रिय प्रमाणपत्र कसे मिळेल, या पिकाची लागवड महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कशी करता येईल याबाबत चर्चा झाली.

Team Agrowon

Buldana News : तालुक्यात विविध पिकांची लागवड व उत्पादन घेतले जात आहे. कृषी विभागाच्या मासिक चर्चासत्रादरम्यान बुधवारी (ता. २७) जिल्हाभरातील अधिकारी व कृषी शास्त्रज्ञांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांच्या मार्गदर्शनात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या चर्चासत्राला आत्मा प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, कृषी उपसंचालक अनुराधा गावडे, श्री. बुटे, केव्हीकेचे डॉ. विकास जाधव, शशांक दाते, श्री. गाभणे, संजय उमाळे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे (खामगाव), तुषार वाघ (मेहकर), विस्तार तंत्र अधिकारी अजय वाडे, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व तालुक्यातील कृषी सहायक व शेतकरी उपस्थित होते.

या चर्चासत्राचे प्रास्ताविक मौजे सोगोडा येथे संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे यांनी केले. या गावातील प्रगतशील शेतकरी राजेश हागे यांच्या औषधी वनस्पती पानपिंपरीच्या शेताला भेट दिली. या वनस्पतीला पूर्णतः सेंद्रिय प्रमाणपत्र कसे मिळेल, या पिकाची लागवड महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कशी करता येईल याबाबत चर्चा झाली. दुर्मिळ होत चाललेल्या पानमळ्याला सुद्धा रमेश हागे यांच्या शेतात भेट दिली.

त्यानंतर सोनाळा येथील अभिता संत्रा प्रोसेसिंग युनिटला भेट दिली. तेथे संत्रा ग्रेडिंग, पॅकिंग, वॅक्सिंग इत्यादीबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर मौजे बावनबीर येथे शेतकरी गोपाल हागे यांच्या एकात्मिक पीक पद्धती शेतीला भेट दिली. येथे संत्रा, सीताफळ, मिरची, शेततळे, गांडूळ युनिट, गोधन आदीची माहिती घेतली.

त्यानंतर रिंगणवाडी येथे पोकरा अंतर्गत दिलेल्या शेडनेट हाऊस मधील भाजीपाला रोप निर्मितीची माहिती घेतली. शेवटी बोडखा येथे मोहन आगरकर यांच्या शेडनेट हाऊस मधील ग्रँड ९ केळी पिकाची माहिती घेतली.

अध्यक्षीय भाषणात श्री. उन्हाळे यांनी नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले. श्री. उमाळे यांनी तूर पिकातील फायटोप्थोरा, पिसारी पतंग, शेंगमाशी, कापसावरील गुलाबी बोंडअळी तसेच हरभऱ्यातील मर रोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. श्रीमती गावडे, श्री. व्यवहारे यांनीही मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement Stop: कापूस संकटात; सीसीआयची  खरेदी आजपासून बंद, मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतरही मुदतवाढ नाही

Single Women Survey: मराठवाड्यात ग्रामपंचायतस्तरावर ४.९३ लाख एकल महिलांची नोंद

Delhi Excise Policy Case : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल, सिसोदिया निर्दोष, अश्रू अनावर

Warehouse Receipt: बुर्किना फासो गोदाम पावतीवर व्यवहार

Water Conservation: वृक्षारोपण, जलसंवर्धनाचा प्रोत्साहक योद्धा

SCROLL FOR NEXT