Manikrao Kokate  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा करा ; कृषिमंत्री कोकाटे

Manikrao Kokate : प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, गुणवत्तापूर्ण बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा व योग्य कृषिविषयक मार्गदर्शन करा, शेतकऱ्यांची सेवा करा, असे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

Team Agrowon

नाशिक : प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, गुणवत्तापूर्ण बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा व योग्य कृषिविषयक मार्गदर्शन करा, शेतकऱ्यांची सेवा करा, असे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नाशिक रामेती येथे आयोजित राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज, हैदराबाद),वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती, नागपूर) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक पुरस्कृत कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र वितरण समारंभात कोकाटे बोलत होते.

या वेळी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, निवृत्त परिवहन अधिकारी प्रकाश बनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा रामेतीचे प्राचार्य शिवाजीराव आमले, ‘स्मार्ट’प्रकल्प नाशिकचे विभागीय नोडल अधिकारी सुनील वानखेडे,‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, साहेबराव क्षीरसागर, अरूण आहेर उपस्थित होते.

कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, की ४८ आठवडे कालवाधीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील तांत्रिक कौशल्ये आणि व्यवस्थापन क्षमता आत्मसात झाली आहे. येणाऱ्या काळात उत्कृष्ट कृषी सेवा देणाऱ्या कृषी सेवा केंद्रांची स्पर्धेतून निवड केली जाणार असून त्यांचाही शासनस्तरावर सन्मान केला जाणार आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा विकासासाठी नवीन प्रयोग व योजना कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.

उपस्थित तुकडी ३ व ४ च्या एकूण ८० प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कोकाटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कृषी विषयांतील पदवीधर नसलेल्या कृषी निविष्ठा विक्री परवानाधारक विक्रेत्यांसाठी डिप्लोमा इन ॲग्रीकल्चर एक्सटेन्शन सर्व्हिसेस फॉर इनपूट डिलर्स (DAESI) अभ्यासक्रम राबविला जातो. किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना असलेल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो.
-प्राचार्य शिवाजीराव आमले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT