Agriculture Minister Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Agriculture Minister: कृषिमंत्री कोकाटे खानदेश दौरा अर्धवट सोडून परतले

Farmer Anger on Manikrao Kokate: विधान परिषदेत कामकाज सुरू असताना मोबाइलवर रमी खेळतानाची चित्रफीत व्हायरल झाल्याने चर्चेत आलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्ह्यात ठाकरे व शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. २५) काळे झेंडे दाखविले.

Team Agrowon

Dhule News: विधान परिषदेत कामकाज सुरू असताना मोबाइलवर रमी खेळतानाची चित्रफीत व्हायरल झाल्याने चर्चेत आलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्ह्यात ठाकरे व शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. २५) काळे झेंडे दाखविले. वाढता रोष लक्षात घेता कोकाटे खानदेश दौरा अर्धवट सोडून माघारी परतले.

विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाइलवर ऑनलाइन रमी खेळताना दिसल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकारानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्री. कोकाटे यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे.

त्यातच माणिकराव कोकाटे हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्ष आक्रमक झाले. मंत्री कोकाटे मुक्कामी थांबलेल्या हॉटेलबाहेर कार्यकर्त्यांनी पत्ते व काळे झेंडे दाखवले. शिंदखेडा तालुक्यातील एका खासगी पेट्रोल पंपाच्या उद्‍घाटन कार्यक्रमासाठी कोकाटे आले होते. या वेळी त्यांना दुष्काळ, कांदा दरावरून प्रश्‍न विचारण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाकडून हॉटेलबाहेर काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला. ‘शेतकऱ्यांनो शेती सोडा, रमी खेळा ह.भ.प. माणिक कोकाटे, शेतकऱ्यांनो रमी खेळा, लाखो जिंका, ऑनलाइन रमी,’ अशा आशयाचे बॅनर्स झळकावण्यात आले. यामुळे परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. धुळे येथून कोकाटे चोपडा (जि. जळगाव) येथे पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहणार होते. पण त्यांनी दौरा अपूर्ण सोडला. आणि ते माघारी परतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT