Dhananjay Munde  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : कृषिमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर

Dhananjay Munde : अवकाळी पावसामुळे फळांची व भाज्यांची पडझड झाली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Beed News : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी (ता. १२) लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला ब्रेक देत धारूर तालुक्यातील चोरंबा, सोनीमोहा, आंबेवडगाव आदी गावांना भेटी देऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा, डाळिंब, मिरची, टोमॅटो आदी पिकांची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांना धीर दिला.

अवकाळी पावसामुळे फळांची व भाज्यांची पडझड झाली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचे अहवाल राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत, अशा सूचना श्री. मुंडे यांनी केल्या.

मागील दोन-तीन दिवसांत सातत्याने बीड जिल्ह्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळे आंबा, डाळिंब, यांसह मिरची, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

बऱ्याच ठिकाणी पंचनामे झाले आहेत, तर उर्वरित ठिकाणचे पंचनामे तातडीने पूर्ण केले जावेत व मदतीचे अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी फळपीकविमा भरलेला आहे त्यांनी नुकसानीचे रिपोर्ट संबंधित कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत, असेही श्री. मुंडे म्हणाले.

या वेळी रमेशराव आडसकर, जयसिंह सोळंके, माधवतात्या निर्मळ, हारूनभाई इनामदार, राम कुलकर्णी, महादेव शिनगारे, नितीन शिनगारे, महादेव तोंडे, हनुमंत नागरगोजे, सुदाम बडे, प्रताप चव्हाण, संदीपान तोंडे, सुग्रीव मुंडे, सतीश बडे, प्रदीप नेहरकर, रमेश मुंडे, प्रवीण शेटे, साहेबराव चव्हाण, बी. एस. घोळवे, गणेश बडे, प्रसाद डापकर, तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी यांसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT