Bird Journey  Agrowon
ॲग्रो विशेष

Animal and bird exhibition : सिंधुदुर्गात ६ मेपासून कृषी, पशुपक्षी प्रदर्शन

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत शासकीय योजनांचा जत्रा आणि कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन येत्या ६ ते ९ मे या कालावधीत कुडाळ येथील नवीन बसस्थानकासमोरील मैदानात भरविण्यात येणार आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत शासकीय योजनांचा जत्रा आणि कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन येत्या ६ ते ९ मे या कालावधीत कुडाळ येथील नवीन बसस्थानकासमोरील मैदानात भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात १०० हून अधिक स्टॉल्स असणार असून या प्रदर्शन कालावधीत विविध शासकीय योजनांच्या ७५ हजार लाभार्थ्याना निवडीचे पत्र दिले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी कृषी प्रदर्शन भरविले जाते. या वर्षीचे कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन कुडाळ येथील नवीन बसस्थानकासमोरील मैदानात होणार आहे. चार दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार असून प्रदर्शनासाठी सुमारे ४८ लाख रुपये खर्च येणार आहे.

अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या प्रदर्शनात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. शासनाच्या महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी विभाग याशिवाय विविध विभागांकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांअंतर्गत निवड झालेल्या ७५ हजार लाभार्थ्यांना निवडीचे पत्र या वेळी देण्यात येणार आहे. या प्रदर्शनात १०० स्टॉल्स असणार आहेत. यात बचत गटांच्या उत्पादनांचत्या स्टॉल्सचा समावेश आहे.

कृषी प्रदर्शनाची पुर्वतयारी सुरू असून विविध विभागांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन चार दिवस चालणार असून सायकांळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील नियोजन सुरू आहे.
प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT