Team Agrowon
दरवर्षी उजनी धरण जलाशयावर फ्लेमिंगोसह अनेक स्थलांतरीत परदेशी पक्षांचे आगमन होत असते.
या वर्षीही भिगवणच्या पक्षी अभयारण्यात जवळपास ३५० हून अधिक प्रकारच्या परदेशी पक्षांचे आगमन झाले आहे.
सैबेरियासह जगाच्या अनेक भागातून हजारो पक्षी नोव्हेंबर सुरू होताच उजनी जलाशयावर दाखल होतात.
महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटक आणि निसर्गप्रेमी पक्षी निरिक्षणासाठी येथे गर्दी करतात. विशेषत: फ्लेमिंगो पक्ष्याचे निसर्गप्रेमींना खास आकर्षण असते.
फ्लेमिंगो शिवाय पेंटेड स्टोर्क, ओपन बिल स्टोर्क, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, सीगल, स्पून बील, लार्ज इग्रेट, नाईट हेरॉन यासारख्या आकर्षक पक्षांची जत्राच येथे भरते.
याशिवाय अनेक निसर्ग छायाचित्रकार, पर्यावरणप्रेमी यांच्यासाठी तर ही पर्वणीच असते. पक्षी निरीक्षणासह जलाशयात नौका विहाराचा पर्यटक आनंदही याठिकाणी घेतात.
करमाळा , इंदापूर , दौंड , भिगवण परिसरात उजनी जलाशयाच्या परिसरात या रंगीबेरंगी परदेशी पक्षांची विहंगम दृष्य पाहायला मिळत आहेत.