Maize Farming agrowon
ॲग्रो विशेष

Maize Farming Maharashtra : शेतकऱ्यांना मका पिकाकडे वळवण्याचा प्रयत्न; मात्र उत्पन्नाची हमी मिळेना

Maharashtra Maize Farming :सध्या कांद्याच्या दरातील चढ-उतारांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड पर्याय म्हणून मका पेरणीकडे वळत आहेत.

sandeep Shirguppe

Agriculture Maharashtra Maize Farming : राज्यातील शेतकऱ्यांना मका पिकाकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. राज्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मका रिसर्चद्वारे 'इथेनॉल उद्योगांच्या पाणलोट क्षेत्रात मक्याचे उत्पादनात वाढ करणे' प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र, मका उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही. यामुळे मका उत्पादक शेतकरी याला पसंती देत नाहीत.

तसेच सध्या कांद्याच्या दरातील चढ-उतारांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड पर्याय म्हणून मका पेरणीकडे वळत आहेत. परंतु, मक्याचे दर दबावात असल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळेना असे चित्र सध्या आहे.

मका उत्पादन घेताना या वाणांची करा निवड

मका पीक घेताना विशिष्ट वाणांची निवड करणे गरजेचे आहे. भारतीय मका संशोधन संस्थेच्या पाणलोट क्षेत्र प्रकल्पांतर्गत, शेतकऱ्यांच्या शेतात प्रात्यक्षिकासाठी डीएचएम ११७, डीएचएम १२१, कोर्टोवा, बायर, बायोसीड इत्यादी जातींचा वापर करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत, शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे संकरित मका बियाणे देण्यात आले, या वाणांनी किडीवर मात करत उगवणीस चांगला प्रतिसाद दिला.

या कीटकनाशकांचा वापर करा

उसासाठी वापरले जाणारे जवळजवळ सर्व पाणी मक्याच्या पुरवठ्यासाठी वापरले जाते. यामुळे जमिनीची उत्पादकता वाढते. खरीप हंगामात केलेल्या प्रयोगांमध्ये, शेतकऱ्यांच्या शेतात या मिश्र पीक पद्धतीमध्ये प्रति एकर २४ क्विंटल मक्याचे उत्पादन वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT