Agriculture Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Harvesting: खानदेशात शेतीची धावपळ : गहू, हरभरा, कांदा काढणीला वेग

Crop Harvesting Challenges: खानदेशात सध्या गहू, हरभरा, कांदा, केळी आणि पपईच्या काढणीला वेग आला आहे. ढगाळ वातावरण आणि मजूरटंचाईमुळे शेतकरी वेगाने कापणी करत असून, उत्पादन खर्च वाढला आहे.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात हरभरा, गहू कापणी व काढणीस वेग आला आहे. रोज ढगाळ वातावरण राहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये पावसाची भीती आहे. यामुळे कापणी, मळणीचे काम गतीने सुरू आहे.

मजूरटंचाईत गहू काढणीत मोठ्या हार्वेस्टरची मदत होत आहे. एकरी १६०० ते १७०० रुपये गहू मळणीसाठी मोठे हार्वेस्टरचालक घेत आहेत. दादर ज्वारी, हरभरा कापणी व मळणीचे कामही सुरू आहे. यासाठी मजुरांची अधिकची गरज आहे. हरभरा, ज्वारी कापणी, कणसे गोळा करण्यासंबंधी एकरी चार हजार रुपये मजुरी घेतली जात आहे.

मजूरटंचाई असल्याने शेतकऱ्यांना सात ते आठ दिवसांची प्रतीक्षा काम करून घेण्यासाठी करावी लागत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त असून, अधिकचा उत्पादन खर्च लागत आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यात पावसाची भीती आहे. यामुळे शेतकरी कामे करून घेण्यासंबंधी धावपळ करीत असून, मजुरांअभावी दमछाक होताना दिसत आहे. कांद्याची लागवड खानदेशात अधिक आहे.

त्यात दरात घसरण झाली आहे. पुढे काढणी पूर्ण होऊन आवकही वाढेल. यामुळे शेतकरी लवकरात लवकर काढणी करून त्याची विक्री करण्यावर भर देत आहेत. कांद्याची १५ ते २० टक्के काढणी खानदेशात झाली आहे. काढणीचे काम या महिन्याच्या अखेरपर्यंत गती घेणार आहे. कारण कांद्याची लागवड डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात विविध टप्प्यांत झाली होती.

जानेवारीच्या मध्यात लागवडीच्या कांद्यात पक्वता नाही. पक्वता येत असून, ही प्रक्रिया आणखी १० ते १२ दिवस सुरू राहील. केळी, पपई काढणीचीही धावपळ मागील आठवड्यापासून पपई, केळी काढणीसही वेग आला आहे. ढगाळ वातावरण सध्या आहे. पुढे पाऊस आल्यास रस्ते खराब होतात.

रस्ते वाळून व्यवस्थित होण्यास सात ते आठ दिवस लागतात. यामुळे शेतकरी पपई व केळीची काढणी करून घेत आहेत. पिके काढणी, कापणी व मळणीवर आहेत. अशात उष्णता वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीदेखील वाढल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales : फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक्टरच्या विक्रीत ३४ टक्के वाढ; खरेदीला पसंती का?

Farmer Justice: अखेर अपघातग्रस्त ट्रॅक्टर शेतकरी कुटुंबाला मिळाला परत!

Agriculture Success Story: बचत गट ते शेतकरी उत्पादक कंपनी

Cotton Bag Scam: कापूस पिशव्यांच्या खरेदीत गैरव्यवहार, चौकशी अहवाल कृषी आयुक्तालयास सादर

Farm Pond: शेततळ्यांसाठीचे १७ हजारांवर अर्ज रद्द

SCROLL FOR NEXT