Mango Export Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Export : निर्यातक्षम आंब्याची ‘मँगोनेट’वर नोंदणी करा ; कृषी विभागामार्फत नोंदणीसाठी विशेष मोहीम; २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत

Mangonet Registration : युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी ‘अपेडा’च्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. २०२४-२५ मध्ये आजअखेर रत्नागिरी जिल्ह्यातून २ हजार ७५ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे.

Team Agrowon

Agriculture Department : रत्नागिरी ः युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी ‘अपेडा’च्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. २०२४-२५ मध्ये आजअखेर रत्नागिरी जिल्ह्यातून २ हजार ७५ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे.

निर्यातक्षम आंबा बागांची मँगोनेट या ऑनलाइन प्रणालीवर नोंदणी करण्यासाठीची मुदत नवी दिल्लीतील ‘अपेडा’ कार्यालयाच्या आदेशानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. उर्वरित कालावधीत विशेष मोहीम राबवून निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

निर्यातक्षम आंबा फळबागेत राबवायच्या योग्य कृषी पद्धती राबविणे आवश्यक आहे. युरोपीय युनियन व अमेरिका देशाला आंबा निर्यात करण्यासाठी क्षेत्रीय किंवा शेतकरी स्तरावर ठेवायचे कागदपत्र विहित प्रपत्रात जतन करून ठेवावीत. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात (प्रपत्र -१) अर्ज दाखल करावयाचा आहे. त्यासाठी सातबारा, ८ अ, आधार कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

त्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांमार्फत म्हणजेच कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी हे क्षेत्राची तपासणी करून त्याची माहिती प्रपत्र ४ अ मध्ये भरून तो अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर २ ब प्रपत्रात नोंदणी प्रमाणपत्र अदा केले जाते. शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाच्या दृष्टीने शेतात राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या बाबींच्या
नोंदी प्रपत्र -क मध्ये वेळेत घेणे आवश्यक आहे.

मँगोनेट प्रणालीमुळे स्थानिक बाजारपेठेच्या तुलनेत हापूस आंब्याला निर्यातीमध्ये चांगला दर प्राप्त होईल. बाजारपेठांमध्ये तीव्र स्पर्धा असल्यामुळे निर्यात हा चांगला पर्याय आहे. जिल्ह्यातील सर्व आंबा बागायतदारांना २०२४-२५ मध्ये चालू हंगामाकरिता मॅंगोनेटवर नोंदणी करण्यासाठी संबंधित कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून मँगोनेटद्वारे नोंदणीसाठी त्वरित अर्ज सादर करावेत. निर्यातक्षम आंबा बागांची वेळेत नोंदणी करण्याकरिता अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी आंबा निर्यात करण्यासाठी भौगोलिक मानांकनाचा (जीआय) चांगल्याप्रकारे उपयोग होण्यासाठी मँगोनेट प्रणालीवरती सहभाग नोंदवावा.
- पांडुरंग सदाफुले,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT