Crop Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : कृषी सल्ला (मध्य महाराष्ट्र)

Agriculture Weather : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील २ ते ३ दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत काही ठिकाणी अतिशय हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

तूर

काढणी

तुरीच्या शेंगा वाळल्यानंतर पीक कापून घ्यावे. खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये, कारण वांझ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

हरभरा

पिकास फांद्या फुटताना.

शेतामध्ये वाफसा असताना दुसरी कोळपणी करून घ्यावी. त्यानंतर खुरपणी करून घ्यावी.

गहू

फुटवे फुटण्याची अवस्था.

पिकास ४० ते ४५ दिवसांनी आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

करडई

फुलोऱ्याची अवस्था.

करडई पिकामध्ये घाटे अळीची अंडी किंवा अळी आढळल्यास, शिफारशीप्रमाणे रासायनिक फवारणी करून घ्यावी. तसेच घाटे अळीचे कामगंध सापळे हेक्टरी ५ प्रमाणे लावल्यास प्रादुर्भाव लवकर लक्षात येऊ शकतो.

टोमॅटो

टोमॅटो पीक फुलोरा अवस्थेत असताना

खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. खतांची मात्रा द्यावी.

कोबी व फुलकोबी

कोबी व फुलकोबीवरील चौकोनी ठिपक्याच्या पतंगाच्या (डीबीएम) नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी इंडोक्झाकार्ब १ मि.लि. किंवा स्पिनोसॅड (२.५ एससी) १ मि.लि.

घाण्या रोग किंवा काळीकूज या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, कॉपर ऑक्झिक्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज

तारीख १० ११ १२ १३ १४

पाऊस (मिमी) १६ ९ -- -- --

कमाल तापमान (अंश सेल्सिअस) ३१ ३० ३२ ३४ ३४

किमान तापमान (अंश सेल्सिअस) १६ १४ १६ १६ १७

सकाळची सापेक्ष आर्द्रता (%) ७५ ७४ ६५ ६९ ६३

दुपारची सापेक्ष आर्द्रता (%) ५७ ४८ ४० ४१ ४१

वाऱ्याचा वेग (किमी/ तास) ११ १२ ११ ९ ८

रब्बी ज्वारी

ओंबी तयार होण्याची अवस्था

तापमानात घट झाल्यामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव पिकामध्ये

होतो. आणि मावा किडीमुळे चिकटा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

पाण्याच्या उपलब्धतेनुसार तिसरे पाणी द्यावे. पक्ष्यांपासून संरक्षण करावे.

मका

वाढीची अवस्था.

मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसताच प्रादुर्भावग्रस्त पिकावरील अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत.

कांदा

वाढीची अवस्था.

कांदा पिकावरील फुलकिडे आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी डायमिथोएट (३० ईसी) १.५ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ईसी) ०.६ मि.लि. अधिक टेब्युकोनॅझोल १ मि.लि. (टॅंक मिक्स) वरील फवारणी स्वच्छ वातावरणात करावी.

०२४२६ - २४३२३९ (प्रमुख ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत.  फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.  खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे.  बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.  लेबल क्लेम वाचावेत.  पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.  रसायनांचा गट तपासावा.

पीएचआय, एमआरएल तपासावेत.  पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा.  पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT