Animal Care  Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture : गोवंश आधारित शेतीच गावाची अर्थव्यवस्था सुधारेल

Indigenous Cow : सध्याचे सरकार गोवंशाला प्रोत्साहन देत आहे, ही निश्‍चितच समाधानाची बाजू आहे.

Team Agrowon

Wardha News : रासायनिक आणि तंत्रज्ञानावर आधारित शेती तोट्याची होत चालली आहे. यामागील कारणांचा वेध घेत हा गुंता सोडविण्यासाठी ट्रॅक्‍टरऐवजी बैलजोडीला अनुदान देत गोवंश आधारित शेतीपद्धतीसाठी पुढाकार घेतला तरच शेतीला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्‍वास गुजरातच्या बंसी गीर गोशाळेचे संस्थापक गोपालभाई सुतारिया यांनी व्यक्‍त केला.

वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या गोपालभाई यांनी ‘ॲग्रोवन’शी विशेष संवाद साधला. ते म्हणाले, की सध्याचे सरकार गोवंशाला प्रोत्साहन देत आहे, ही निश्‍चितच समाधानाची बाजू आहे. शेण-गोमूत्र आधारित शेतीपद्धतीच फायद्याची असल्यामुळे सरकार गोवंश वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.

आम्ही देखील आमच्या गोशाळेत संशोधनावर भर दिला. त्या माध्यमातून शेणामध्ये १२००, तर गोमूत्रात ५००० कंपाउंड असल्याचे सिद्ध झाले. त्याचा वापर करून गोकृपा अमृतम हे जैविक संजीवक तयार करण्यात आले आहे.

ते तयार करण्याची प्रक्रिया आम्ही निःशुल्क शिकवितो किंवा प्रसार करतो. त्याच्याच आधारे ३५०० टीडीएसमध्ये देखील आंबा उत्पादन आम्ही घेतले. गोकृपा अमृतमचे परिणाम अनुभवण्यासाठी १० प्रकारच्या मातीत प्रयोग करण्यात आले.

प्रकृतीचे संवर्धन शेतकऱ्यांनी केले; त्यांनी कमी पाण्यात शेती केली; त्याच्यावर रसायन थोपविले. मात्र तंत्रज्ञान नव्हते तरी शेती फायदेशीर ठरत होती. आता तंत्रज्ञान असताना ती परवडत नाही, त्यामागे काय कारणे आहेत. या विचार झाला पाहिजे. ट्रॅक्‍टरवर सबसिडी आहे, त्यातून प्रदूषण वाढते. याउलट शेणामुळे जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ट्रॅक्‍टरऐवजी अनुदान बैलावर द्यायला हवे असून, ते वाढविण्याची गरज आहे.

- गोपालभाई सुतारिया, संस्थापक, बंसी गीर गोशाळा, गुजरात

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT