Agriculture Assistant Protest Agowon
ॲग्रो विशेष

Agriculture Assistant Protest : कोल्हापुरात कृषी सहायकांचे धरणे आंदोलन

Agriculture Department : कृषी सहायक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याचा मोठा परिणाम शेतकरी संपर्कावर झाला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : राज्य शासनाने कृषी सहायकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील कृषी सहायकांनी आंदोलन तीव्र करत सोमवारी (ता. १९) येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. कोणत्याही परिस्थितीत हक्काच्या मागण्या मान्‍य केल्‍याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार या वेळी करण्यात आला.

कृषी सहायक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याचा मोठा परिणाम शेतकरी संपर्कावर झाला आहे. खरीपपूर्व प्रशिक्षण कामे रखडली आहेत. आमच्या हक्‍काच्या मागण्या मान्य होत नसल्याने आम्हाला नाईलाजास्तव हे आंदोलन करावे लागत आहे.

आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलनाची धार वाढविली पण शासनाने दुर्लक्ष करून कृषी सहायकांवर अन्याय केल्याची भावना या वेळी अनेक कृषी सहायकांनी व्‍यक्त केली. मागण्या मान्य नाही झाल्या तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

या वेळी विभागीय सचिव संदीप कांबळे, जिल्‍हाध्यक्ष प्रदीप गावडे, कार्याध्यक्ष अमोल टिपुगडे, जिल्हा सरचिटणीस अनिल कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष महादेव जाधव आदींसह संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

कृषी पर्यवेक्षक संघटनेचाही पाठिंबा

कृषी सहायकांच्या आंदोलनाला कृषी पर्यवेक्षक संघटनेनेही पाठिंबा दिला. कृषी सहायकांच्या मागण्या रास्त असून आम्हीही येणाऱ्या काळात आंदोलनात उतरत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

कृषी पर्यवेक्षक संघटनेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष पाटील, जिल्हाध्‍यक्ष विठ्ठल चव्हाण, सरचिटणीस संपतराव मुळीक, कार्याध्यक्ष संतोष कुंभार, कोषाध्यक्ष प्रमोद शिंगे, स्मिता नावलगी, संजय सुतार, शिवानंद शिरढोणे, कमाल बाणदार, राहुल पाटील, बाबूराव पाटील, आदींनी कृषी सहायक संघटनेच्‍या पदाधिकाऱ्यांना पाठिंबा व्यक्त करून आंदोलनात सहभाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT