ॲग्रो विशेष

Farmer Priorities : शेती, शेतकरी कायम प्राधान्यक्रमात : खासदार अनुप धोत्रे

MP Anup Dhotre : आपल्या संपूर्ण कार्यकाळात शेती आणि शेतकरी हा आपला कायम प्राधान्यक्रम राहील, असे आश्‍वासन जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार अनुप धोत्रे यांनी दिले.

Team Agrowon

Akola News : आपल्या संपूर्ण कार्यकाळात शेती आणि शेतकरी हा आपला कायम प्राधान्यक्रम राहील, असे आश्‍वासन जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार अनुप धोत्रे यांनी दिले. मंगळवारी (ता.११) त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला. या वेळी माजी महापौर विजय अग्रवाल, जयंत मसने, गिरीश जोशी उपस्थित होते.

खासदार झाल्यानंतर पहिले काम आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते उपलब्ध होण्यासाठी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. तातडीने साठा उपलब्ध करण्याची शासकीय अधिकारी, खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनाही सूचना केली. दिल्ली येथे रेल्वे रॅकच्या मुद्यावर अधिकाऱ्यांकडून माहिती घेत तातडीने उपाययोजना करण्याचे सुचवले.

त्यामुळे आता रॅक उपलब्ध झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी विशिष्ट पीकवाण, रासायनिक खतांची मागणी करू नये. एखाद्या वाणाच्या बरोबरीने दुसरे वाणही निश्‍चित सरस असतात. असेच रासायनिक खताचेही आहे. त्यामुळे याचा विचार शेतकऱ्यांनी करणे निश्‍चितच हितावह ठरेल, असेही खासदार धोत्रे म्हणाले.

पश्‍चिम विदर्भात अकोला हे औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर आहे. शेती आधारित उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय केंद्र शासनाने उद्योगधंदे सुरू करण्यासाठी सुटसुटीत केलेल्या धोरणांमुळे मागील दोन वर्षांत येथे दोन स्पिनिंग उद्योग सुरू झाले. उद्योगधंद्यात वाढ, रोजगार निर्मितीसाठी आपण कायम सकारात्मक आहोत. यासाठी निश्‍चित प्रयत्नही केले जातील, असेही सांगितले.

‘कुठे कमी पडलो याचा शोध घेणार’

लोकसभा निवडणुकीच्या निकालात काही विधानसभा मतदार संघांत मताधिक्य घटल्याचे दिसून येत आहे. जेथे आमचे आमदार नाहीत, अशा ठिकाणी हे झालेले आहे. त्यामुळे येत्या काळात या मतदार संघांमध्ये आपण जातीने लक्ष घालून विकास कामांना गती देऊ. सोबतच उर्वरित मतदार संघांमध्येही विकास कामे गतीने पुढे नेणार असल्याचेही खासदार धोत्रे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT