Hasan Mushrif agrowon
ॲग्रो विशेष

Hasan Mushrif : 'कृषी अधिकाऱ्यांनी स्वत: शेती करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे'

Sugarcane Farmer : शेतकऱ्यांना ऊस उत्पादनात, इतर पिकांमधे मार्गदर्शन करून कृषी विभागने उप्त्पादन वाढीसाठी ठोस काम करावे असे मुश्रीफ म्हणाले.

sandeep Shirguppe

Kolhapur Farmer News : दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या पीक उत्पादकतेत घट होत असून उसासह सर्वच पीकांचा यात कमी अधिक प्रमाणात समावेश झाला आहे. त्यामुळे कृषी विभाग, त्यातील तज्ज्ञांनी उत्पादकता वाढीसाठी जबाबदारी घेवून कार्य करावे असे कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी वनामती नागपूरच्या अधिनस्त प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात रामेती या संस्थेच्या प्रशिक्षणार्थी वसतीगृह इमारतीचे उद्घाटन शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन केले.

यावेळी ते म्हणाले की, हल्ली ऊस उत्पादनात एकरी उत्पन्न कमी होत आहे, कारखाने ५-६ महिनेच चालतात, कारखानदारांना काम न करताच कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागते. या वर्षी सर्वात कमी गाळप हंगाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामूळे शेतकऱ्यांना ऊस उत्पादनात, इतर पिकांमधे मार्गदर्शन करून कृषी विभागने उप्त्पादन वाढीसाठी ठोस काम करावे असे मुश्रीफ म्हणाले.

यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी बोगस बियाणे, खते व किटकनाशके यावर आळा घालण्यासाठी शासन कायदा करीत असल्याचे सांगितले. यामधे विक्रेता जर बोगस बियाणे निर्मिती प्रक्रियेत सहभागी नसेल त्यावर कारवाई होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बोगस बियाणांची पेरणी केल्यास शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम वाया जातो.

शेतकरी हाच आपला वाली आहे, तो राजा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण चांगले कार्य करणे गरजेचे आहे. कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्वत:च्या शेतात चांगली शेती करून इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण करावा असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार सतेज पाटील यांनी कृषी विभाग, आत्माच्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांसाठी चांगले प्रयोग राबविण्यात येत असल्याचे सांगितले. रामेतीला आता प्रशस्त अशी प्रशिक्षणार्थी निवास व्यवस्था झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांसाठी आता कृषी भवनाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

या मेळाव्यात बसवराज बिराजदार विभागीय कृषी सहसंचालक यांनी मनोगत व्यक्त केले तसेच प्रास्ताविक रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील यांनी केले. सुत्रसंचलन प्रविण बनसोडे यांनी केले तर आभार अरूण भिंगारदिवे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर यांनी मानले. या कार्यक्रमात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि बदलते कृषी तंत्रज्ञान या पुस्तकांचे विमोचन पालकमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT