Bribe Agrowon
ॲग्रो विशेष

Bribe News : लाच प्रकरणी पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी जाळ्यात

Latest Agriculture News : कृषी सेवा केंद्र दुकानातील औषधांचे सॅम्पल न घेण्यासाठी, वर्षभराच्या हंगामामध्ये कारवाई न करता सहकार्य करावे यासाठी १० हजाराची लाच मागणारा पंचायत समितीचा विस्तार अधिकारी (कृषी) धाराशिवच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला आहे.

Team Agrowon

Dharashiv News : कृषी सेवा केंद्र दुकानातील औषधांचे सॅम्पल न घेण्यासाठी, वर्षभराच्या हंगामामध्ये कारवाई न करता सहकार्य करावे यासाठी १० हजाराची लाच मागणारा पंचायत समितीचा विस्तार अधिकारी (कृषी) धाराशिवच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, याप्रकरणी लाच मागणी ६ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. बुधवारी (ता. ४) ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात पंचासमक्ष स्वीकारली आहे. पाटोदा (जि. बीड) पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (कृषी) जयेश मुकुंद भुतपल्ले असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांचे कृषी सेवा केंद्र दुकानातील औषधांचे सॅम्पल न घेण्यासाठी, वर्षभराच्या हंगामामध्ये कारवाई न करता सहकार्य करावे यासाठी लोकसेवक यांनी दहा हजार रुपये लाच रकमेची मागणी केली होती.

बुधवारी (ता. ४) दहा हजाराची लाच रक्कम पंचांसमक्ष स्वतः स्वीकारली. त्यावरून लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पाटोदा, जि. बीड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा

दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली सापळा पथकाने कारवाई केली. पथकामध्ये पोलीस अंमलदार विशाल डोके, विष्णू बेळे, सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, दत्तात्रेय करडे यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT