Agricultural Cultivation agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Cultivation : खानदेशात शेती मशागतीला वेग; मजूरटंचाईचा फटका

Agricultural Cultivation : खानदेशात कापसाची लागवड अधिक असते. यामुळे कापूस लागवडीची तयारीदेखील कृत्रिम जलसाठाधारक शेतकरी गावोगावी करीत आहेत.

Team Agrowon

Agricultural Cultivation Jalgaon : लहान, अल्पभूधारक शेतकरी पुढे पीक लागवडीचे नियोजन करीत आहेत. खानदेशात कापसाची लागवड अधिक असते. यामुळे कापूस लागवडीची तयारीदेखील कृत्रिम जलसाठाधारक शेतकरी गावोगावी करीत आहेत. शेतीच्या मशागतीसाठी पूर्वी बैलजोडीचा उपयोग अधिकचा करायचे. परंतु अलीकडे ट्रॅक्टर व अन्य यंत्रणा आली आहे.

या यंत्रणेच्या मदतीने शेतकरी मशागत करून घेत आहेत.

अनेकांनी महिनाभरापूर्वी खोल नांगरणी करून शेत तापू दिले. त्यात आता रोटाव्हेटरने शेत भुसभुशीत केले जात आहे. शेत भुसभुशीत करून त्यात केळी, कापूस लागवडीचे नियोजन कृत्रिम जलसाठाधारक शेतकरी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात केळी, कापूस व अन्य भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी अनेक जण गादीवाफे तयार करून घेत आहेत. नंदुरबारात केळी, मिरची, कारली, टोमॅटो व अन्य पिकेही असतात. या पिकांच्या लागवडीची तयारी या भागात झाली आहे.

शेणखत, चारा वाहतूक

सध्या शिवारात चाऱ्याची किंवा कडब्याची कुट्टी करून पडून आहे. दुसरीकडे वादळी पाऊस, पावसाची स्थिती आहे. यामुळे शेणखतासह चारा वाहतूक शेतकरी गतीने करून घेत आहेत. शेतकऱ्यांना या कामातही मजूरटंचाईचा सामना करावा लागत आहे. कारण उष्णतेत कामे करण्यास मजूर नकार देतात.

उष्णेतेमुळे जूनमध्ये लागवडीचे नियोजन

खानदेशात कापूस, केळी, मिरची आगाप लागवड केली जात होती. परंतु उष्णता आता अधिक आहे. त्यात पुढे आणखी वाढीचे संकेतही आहेत. यामुळे शेतकरी सध्या शेत लागवडीसाठी तयार करून घेत आहेत. अनेकांनी गादीवाफ्यांवर मिरची व अन्य पिकांसाठी पॉली मल्चिंगदेखील टाकून घेतले आहे. १ जून किंवा ५ जूनपर्यंत त्यात लागवड केली जाईल. कापसाची लागवडदेखील अनेक जण १ जूननंतर करतील, असे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Welfare: निघोज फलोद्यान सहकारी संस्थेचा कारभार शेतकरी हिताचा: प्रदीप वळसे

Kusum Solar Pump Complaints: कुसुम सौरपंपांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी; लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन

Panand Road Development: पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार करा; सुनेत्रा पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Fertilizer Dealers Protest: खत विक्रेत्यांचे आंदोलन बेकायदेशीर; कृषी विभागाची भूमिका

Krushimitra Recruitment Scam: कृषिमित्र भरती रॅकेट प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT