Agriculture Awards Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Award : जालना जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार

Award Announced : राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्यव्यवसाय विभागातर्फे देण्यात येणारे वर्ष २०२०, २०२१ व २०२२ मधील विविध पुरस्कार जाहीर झाले.

Team Agrowon

Jalna News : कृषी, फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, संस्थांना राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्यव्यवसाय विभागातर्फे देण्यात येणारे वर्ष २०२०, २०२१ व २०२२ मधील विविध पुरस्कार जाहीर झाले.

या पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांमध्ये जालना जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांचा समावेश आहे.जालना जिल्हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. निसर्गाने दिली साथ तर पीकपाणी चांगलं झालं आणि उत्पन्न चांगल झालं तर ठीक नाहीतर अवकाळी, अतिवृष्टी किंवा कोरडा दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो.

बाजारात दर मिळण्याचा प्रश्न आहेच. मात्र, असे असतानाही प्रतिकूल परिस्थितीत काही शेतकरी प्रयोग करतात. पारंपरिक पिकांसोबतच आधुनिक शेती करण्याचे धाडस करून यशस्वी होत आहेत. त्यांच्या प्रयोगातून प्रेरणा घेत अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे शेतकरी वळू लागले आहेत.

अशाच प्रयोगशील जालना जिल्ह्यातील ६ शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार दिला जाणार आहे. यानिमित्ताने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांनी पुरस्कार्थींचे कौतुक करत अन्य शेतकऱ्यांनी पुरस्कार प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

पुरस्कार विजेते शेतकरी

अ) वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार (सन)

१) श्रीकृष्ण नामदेव डोंगरे (२०२०) रा. बाजी उम्रद, जालना

ब) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

१) पांडुरंग निवृत्ती डोंगरे (२०२०) रा. कर्जत, अंबड

२) उदयसिंग सुखलाल चुंगडे (२०२१) रा. ठालेवाडी, ता. भोकरदन

३) रामदास शेषेराव बारगाजे (२०२२) रा. भराडखेडा, ता. बदनापूर

क) जिजामाता कृषिभूषण पुरस्कार

१. सुचिता दत्तात्रय शिनगारे (२०२२) खेडगाव, ता. अंबड

ड) उद्यानपंडित पुरस्कार

रामेश्वर भगवान उबाळे, नंदापूर, ता. जालना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT