Agriculture Development Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Development : कृषी व्यवसाय विकासाला आता मिळणार चालना

Agri Business : एबीआय केंद्राद्वारे द्राक्ष उत्पादन व निगडित प्रक्रिया उद्योगांसाठी नवउद्योजकांना तांत्रिक साहाय्य देण्यात येते. या आधीही एकूण १४ करार झालेले आहेत.

Team Agrowon

Pune News : भारतीय कृषी संशोधन परिषद (भाकृअनुप) आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथील ‘अॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर’ द्वारे (एबीआय) दोन कंपन्यांसोबत तंत्रज्ञान हस्तांतरणाचा सामंजस्य करार करण्यात आला.

एबीआय केंद्राद्वारे द्राक्ष उत्पादन व निगडित प्रक्रिया उद्योगांसाठी नवउद्योजकांना तांत्रिक साहाय्य देण्यात येते. या आधीही एकूण १४ करार झालेले आहेत. ‘एबीआय’चे प्रमुख डॉ. अजय कुमार शर्मा यांनी दोन्ही कंपन्यांची माहिती दिली. त्यांची भविष्यातील उद्दिष्टे सादर केली.

‘भाकृअनुप’च्या नॅशनल अॅग्रिकल्चर इनोव्हेशन फंड योजने अंतर्गत मांजरी (जि. पुणे) येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये जानेवारी २०२० पासून कृषी व्यवसाय नाविन्यता केंद्र (एबीआय) सुरू केले आहे.

या केंद्रामार्फत कृषी आधारित उद्योगासाठी पूरक वातावरण निर्मिती, स्टार्ट अप उपक्रमांना साह्य करणे, शेतकरी उत्पादक संस्था किंवा कंपनी स्थापण्यासाठी मदत करणे अशी कामे केली जातात.

नावीन्यपूर्ण कृषी उद्योग उभारणीसंदर्भात कृषी पदवीधर, ग्रामीण होतकरू तरुण शेतकऱ्यांमध्ये जागरूकतेसाठी परस्परसंवाद सत्र, बैठकांचे आयोजन केले जाते. या केंद्राअंतर्गत शुक्रवारी (ता. २७) दोन उद्योगांसोबत तांत्रिक मार्गदर्शनासाठी सामंजस्य करार करण्यात आले.

इंदापूर येथील ‘मे. फ्रेष्टा किसान उत्पादक कंपनी लि.’च्या श्री. दीपक कारगल आणि श्री राजेंद्र वाघमोडे यांच्याशी ‘मांजरी मेडिका' द्राक्ष जातीच्या गुणवत्तापूर्ण बेदाना निर्मिती प्रोत्साहनासाठी एक करार करण्यात आला.

तर कोल्हापूर येथील ‘मे. रेजनरी एलएलपी’चे सुजित कुदळे आणि रउफ नायकवाड़ी यांनी बेदाणा जॅम तसेच बेदाण्यापासून बनवण्यात येणारे मुखवास (माऊथ फ्रेशनर) उत्पादन करणारा अनोखा प्रकल्प सादर केला.

या करारावर केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी यांनी स्वाक्षरी केली. डॉ. निशांत देशमुख यांनी आभार मानले. या वेळी डॉ. अजय कुमार उपाध्याय, मुनीश गन्टी कांदा लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर येथील शास्त्रज्ञ डॉ. राजीव काळे, शंतनू जगताप, हेमंत सस्ते, डॉ. गणेश जाधव आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT