Sugarcane Research  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Research : ऊस संशोधनासाठी ‘वनामकृवि’,‘व्हीएसआय’ यांच्यात करार

VSI : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) यांच्यात ऊस पिकातील संशोधन, शिक्षण आणि विस्‍तार याकरिता गुरुवारी (ता. ८) परभणी येथे सामंजस्य करार करण्‍यात आला.

माणिक रासवे

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) यांच्यात ऊस पिकातील संशोधन, शिक्षण आणि विस्‍तार याकरिता गुरुवारी (ता. ८) परभणी येथे सामंजस्य करार करण्‍यात आला.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित बैठकीत संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, ‘व्हीएसआय’चे शास्‍त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग, डॉ. एस. जी.दळवी आदी उपस्थित होते.

डॉ. इंद्र मणी म्‍हणाले, ‘‘मराठवाडा विभागातील ऊस शेती संशोधनास चालना मिळेल. भविष्‍यात साखर उद्योग क्षेत्रात विद्यार्थ्‍यांना कौशल्‍य विकासाकरिता ऊस शेती, साखर कारखाना, मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती, अल्‍कोहोल निर्मिती तंत्रज्ञान, बॉयो फ्यूएल आदींवर आधारित अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात येतील.

शेतकऱ्यांना सुधारित ऊस लागवडीचे प्रशिक्षण आयोजित करण्‍यात येईल. या करारामुळे मराठवाड्यातील ऊस संशोधनास व पदव्‍युत्तर विद्यार्थ्‍यांना संशोधनाकरिता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्‍थेमधील विविध सोईसुविधांचा फायदा घेता येईल.’’

या करारावर ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू-पाटील, शास्‍त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग, डॉ. एस. जी. दळवी, तर डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. गोदावरी पवार, डॉ. मदन पेंडके यांनी स्‍वाक्षरी केल्‍या. बैठकीस नियंत्रक प्रवीण निर्मल, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. व्ही. एस. खंदारे, विभाग प्रमुख, संशोधक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Water Tourism: उजनी जलपर्यटनाचे भवितव्य अंधारात

Agriculture Officer Retirement: नाशिक ‘झेडपी’चे कृषी विकास अधिकारी शेवाळे सेवानिवृत्त

Revenue Department: अधिकाऱ्यांनी गावांत जाऊन समस्या सोडवाव्या: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Water Scheme Delayed: पाणी योजना चार वर्षांपासून रखडली

Summer Fruits Sale: चिंच-बोरांच्या विक्री हंगामाला सुरुवात

SCROLL FOR NEXT