Agriculture News  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Research : दापोलीच्या कृषी विद्यापीठाचा ‘भात संशोधन संस्थे’शी करार

Paddy Farming : भात जाती संशोधनाला चालना देण्यासाठी फिलीपाईन्स येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था (ईरी) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या दरम्यान नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

Team Agrowon

Ratnagiri News : भात जाती संशोधनाला चालना देण्यासाठी फिलीपाईन्स येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था (ईरी) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या दरम्यान नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

फिलीपाईन्स येथे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे महानिर्देशक डॉ. अजय कोहली यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या.

१५ ते २० ऑक्टोबर या कालावधीमध्ये आयोजित सहाव्या आंतरराष्ट्रीय भात परिषदेमध्ये डॉ. भावे आणि कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील भात पैदासकार डॉ. भरत वाघमोडे सहभागी झाले होते.

त्यावेळी हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार, भाताच्या विविध स्थानिक जातींचे संकलन, वैशिष्ट सुधारणा त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती, पाण्याचा अति ताण सहन करणाऱ्या जाती तसेच विविध कीड, रोग प्रतिकारक जातींवर संशोधन करण्यात येईल.

जलद संकरीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या घटकांचा संशोधनात समावेश करण्यात येणार आहे. विद्यापीठातील भात संशोधक, आचार्य पदव्युत्तर विद्यार्थ्यांना फिलीपाईन्स येथे संशोधन करण्याची संधी निर्माण झाली आहे.

या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, शैक्षणिक आणि संशोधनाबाबत विविध प्रकल्प राबविणे शक्य होईल. या वेळी आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेतील तज्ज्ञ डॉ. उमाशंकर सिंग, डॉ. संकल्प भोसले, दक्षिण आफ्रिकेचे संशोधन समन्वयक डॉ. अजय पंचभाई आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT