Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Protest : दूध दरासाठी ठिकठिकाणी आंदोलने,‘रास्ता रोको’

Milk Rate : दुधाला किमान ३४ रुपये प्रती लीटर दर देण्याची शासनाने नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन वेगवेगळ्या कारणाने दुधाचे दर पाडल्याचा निषेध करत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलने केली.

Team Agrowon

Nagar News : दुधाला किमान ३४ रुपये प्रती लीटर दर देण्याची शासनाने नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन वेगवेगळ्या कारणाने दुधाचे दर पाडल्याचा निषेध करत रविवारी (ता. १९) नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलने केली.

काही ठिकाणी दुग्धविकास मंत्र्याच्या प्रतिमेवर दूध ओतून निषेध केला. दूध दराबाबत शासनाने गांभिर्याने घेऊन दरवाढ करावी यासह विविध मागण्या करत मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करण्या इशारा दिला आहे.

राज्यात खासगी व सहकारी दूध संघचालकांनी संगनमत करून दुधाचे दर पाडले आहेत. चार ते पाच महिन्यांत सुमारे १० ते ११ रुपयांनी प्रतिलिटरचे दर खाली आहेत. दुधाचा दर निश्चित करण्यासाठी शासनाने चार महिन्यांपूर्वी समिती नियुक्ती केली. दुधाचे दर कमी करणे, रिटर्नचे दर वाढवणे असा मनमानी कारभार खासगी दूध संघांचा असताना पशुसंवर्धनमंत्री, पशुसंवर्धन विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.

दुधाची भेसळ मात्र राजरोस सुरू असून त्याकडेही शासनाचे दुर्लक्ष आहे. अशा गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादक आक्रमक झाले आहेत.रविवारी नगर जिल्ह्यातील निमगाव खैरी, कोल्हार भगवती, अशोकनगर फाटा, खडकी, खिर्डी, श्रीगोंदा, काळेगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलने झाली.

नेतृत्व नव्हे, शेतकरीच पुढे

दूध दरासंदर्भात अंदोलन करण्यासाठी आतापर्यत संघटना, नेते पुढाकार घेत आहे. रविवारी झालेल्या आंदोलनाबाबत मात्र कोणत्याही पक्ष, संघटनेच्या नेत्यांचे नेतृत्व नव्हते तर ठिकठिकाणचे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलने केली. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध करत संताप व्यक्त केला.

अशा केल्या मागणी

दुधाला ४० रुपये प्रतिलिटरचा हमीभाव द्यावा,

पशुखाद्याच्या किमती पन्नास टक्के कमी कराव्यात,

पशुऔषधावरील जीएसटी कमी करावा,

दूध भेसळ थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT