Banana Harvest Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Harvest: खानदेशात आगाप कांदेबाग केळीच्या काढणीला सुरुवात

Jalgaon Banana Farming: खानदेशात आगाप कांदेबाग केळीच्या काढणीला सुरुवात झाली आहे. आवक स्थिर आणि दरही स्थिर आहेत. सणउत्सव काळात केळी उत्पादकांना लाभ होण्याची अशी अपेक्षा आहे.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात आगाप कांदेबाग केळीच्या काढणीला सुरुवात झाली आहे. आवक स्थिर आणि दरही स्थिर आहेत. सणउत्सव काळात केळी उत्पादकांना लाभ होण्याची अशी अपेक्षा आहे. केळीची आवक कमीच आहे. त्यात पुढे फारशी वाढ होईल, असे दिसत नाही.

मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांत लागवड केलेल्या (कांदेबाग बहर केळी) केळी पिकात सध्या काढणी सुरू आहे. या केळीची लागवड जळगाव जिल्ह्यात अधिक आहे. जळगावातील चोपडा, जळगाव, यावल, मुक्ताईनगर, रावेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर भागांत आगाप कांदेबाग केळी बागा आहेत.

या बागांत मे मध्येच निसवण झाली. या बागा काढणीवर आलेल्या आहेत. उतिसंवर्धित केळी रोपांच्या बागा जोमात आहेत. त्यात काढणी एकाच वेळी होईल, अशी स्थिती आहे. उत्तर भारतात श्रावणमास सुरू झाला आहे. पुढे राज्यातही सणासुदीचे दिवस आहेत. या कालावधीत केळीस मागणी असते.

मागील हंगामात श्रावणमास ते गणेशोत्सव या कालावधीत केळीस प्रतिक्विंटल कमाल ३३०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले होते. यंदा कांदेबाग केळीची जळगाव, चोपडा भागात हानी झाली. सध्या केळीचे कमाल दर खानदेशात २५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. तर किमान दर १५०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

केळी दरात कुठलीही मोठी घसरण मागील १० ते १५ दिवसांत झालेली नाही. पुढेही दर स्थिर राहतील, असे संकेत आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या बाजारातही केळीची आवक कमी आहे. तेथेही केळीस लिलावात कमाल २५०० रुपयांवर दर मिळाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT