Leopard Attack  agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack : वैराग भागात वाघापाठोपाठ तरस, बिबट्याच्या हल्ल्याने भीती

Tiger Terror : वैराग भागातील ग्रामस्थ वाघाच्या दहशतीतून सावरत असतानाच दुसरीकडे बिबट्याने वैराग शिवारात गुरुवारी (ता. १६) सकाळी आठच्या सुमारास रेडकाची शिकार करून त्यांना ठार केले.

Team Agrowon

Solapur News : वैराग भागातील ग्रामस्थ वाघाच्या दहशतीतून सावरत असतानाच दुसरीकडे बिबट्याने वैराग शिवारात गुरुवारी (ता. १६) सकाळी आठच्या सुमारास रेडकाची शिकार करून त्यांना ठार केले.

वनपाल एस. एस. पुरी यांनीही या भागात आढळलेले ठसे हे बिबट्याचेच असल्याचा दुजोरा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैराग जवळील पिंपरी रोडवरील अमोल भोसले या शेतकऱ्याच्या गोठ्याबाहेर बांधलेल्या रेडकावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले.

ही घटना गुरुवारी सकाळी घडली. पानगाव फॉरेस्ट परिसरात नऊ जानेवारीला नागरिकांना बिबट्या दिसला होता. त्यानंतर त्याच्या हल्ल्याविषयी पुढे फारसे काही आढळून आले नाही. मात्र पुन्हा एकदा आठ दिवसांनी वैराग येथे बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली आहे.

दोन दिवसांपूर्वी भालगाव येथे तरस या वन्य प्राण्याने रेडकावर हल्ला करून त्याला ठार केले होते. या आधीपासूनच या भागात वाघामुळे दहशत असताना, आता तरस व बिबट्या यांच्या हल्ल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मी सकाळी सात वाजता शेतात धार काढण्यासाठी आलो होतो, धार काढून पुन्हा गुरे गोठ्याबाहेर बांधली. पुन्हा घरी येऊन नऊ वाजता शेतात गेलो असता, म्हशीच्या रेडकावर बिबट्या सदृश प्राण्याने हल्ला केला, त्यात तो जागीच ठार झाल्याचे दिसून आले.
- अमोल भोसले, शेतकरी, वैराग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: सरसकटचे गौडबंगाल

Kolhapur Politics: कोल्हापुरात राष्ट्रवादी- शिंदेंच्या शिवसेनेत संघर्ष टोकाला, 'मी बोललो तर बात दूर दूर तक जाईल', मुश्रीफांचा मंडलिकांना इशारा

Desi Cow Research: देशी गोपालन मॉडेलची कृषी, पशुसंवर्धन सचिवांकडून पाहणी

Leopard Conflict: ...तर बिबट निर्बिजीकरण अडकेल ‘लाल फिती’त!

Sugarcane Harvest: हार्वेस्टरमुळे राज्यात ऊस तोडणीची द्रुतगती

SCROLL FOR NEXT