Land Sealing Act Agrowon
ॲग्रो विशेष

Land Award Act : जमीन एकदा बक्षीस दिल्यावर मग पुढे नस्ती उठाठेव करू नये...

काही दिवसांनंतर गावात बँक सुरू झाली व बँकेचे व्यवहार पण सुरू झाले. ग्रामपंचायतीने बँकेसोबत केलेल्या करारामुळे त्या जागेच्या भाड्याच्या स्वरूपात ग्रामपंचायतीला दरमहा उत्पन्न देखील सुरू झाले.

शेखर गायकवाड

शेखर गायकवाड

Rural story : एका गावात यशवंत नावाचा एक शेतकरी राहत होता. यशवंतच्या कुटुंबात थोरला भाऊ बळवंत पण राहत होता. काही काळानंतर अकस्मात बळवंतचे निधन झाले.

भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ यशवंतने स्वतःची आठ गुंठे जमीन (Agriculture Land) ग्रामपंचायतीला (Gram Panchayat) सार्वजनिक कामासाठी बक्षीसपत्राने दान दिली.

गावकऱ्यांनी यशवंतचा मोठ्या सन्मानाने सत्कार केला. त्यानंतर ग्रामपंचायतीने सरकारकडे प्रस्ताव पाठवून शासकीय निधी मंजूर करून घेतला आणि ग्रामपंचायत कार्यालय दोन गुंठे क्षेत्रात बांधले व राहिलेले सहा गुंठे क्षेत्र अनेक वर्षे तसेच पडून होते.

काही वर्षांनंतर गावात ग्रामीण बँकेच्या नवीन शाखेसाठी जागेची गरज असल्यामुळे ग्रामपंचायतीने चार गुंठे जमीन बँकेला देण्याचे ठरविले. गावात बँक उघडणार म्हणून गावकरी पण खुश झाले, कारण त्यांची पण गावात बँक येणार म्हणून चांगली सोय होणार होती.

काही दिवसांनंतर गावात बँक सुरू झाली व बँकेचे व्यवहार पण सुरू झाले. ग्रामपंचायतीने बँकेसोबत केलेल्या करारामुळे त्या जागेच्या भाड्याच्या स्वरूपात ग्रामपंचायतीला दरमहा उत्पन्न देखील सुरू झाले.

काही दिवसांनंतर यशवंतच्या डोक्यात ही गोष्ट गावातल्या कुणीतरी भरवली, की तू बक्षीस दिलेली जमीन ग्रामपंचायतीने सार्वजनिक कामासाठी न वापरता व्यापारी तत्त्वावर बँकेला भाड्याने दिली आहे.

याबाबत यशवंतने कलेक्टर कचेरीमध्ये तक्रार केली व तक्रारीमध्ये यशवंतने असाही आरोप केला, की या जमिनीमध्ये प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. २६ जानेवारीला यशवंत कलेक्टर कचेरीसमोर उपोषणाला बसला व शेवटी जमिनीचा हा वाद दिवाणी कोर्टात गेला.

दिवाणी कोर्टाने काही दिवसांनंतर असा निकाल दिला, की एकदा बक्षीस म्हणून जमीन दिली, की त्या जमिनीचा वापर ग्रामपंचायतीने कोणत्या कामासाठी केला पाहिजे ते सांगण्याचा यशवंतला कोणताही अधिकार व हक्क नाही.

सांगायचे तात्पर्य म्हणजे जर जमीन एकदा कायदेशीर दस्ताने बक्षीस दिल्यानंतर पुन्हा त्यावर अटी लावण्याचा पूर्वीच्या मालकास कोणताही हक्क राहत नाही.

लेखक ई-ईमल - shekharsatbara@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI in Sugarcane Farming: सुरु उसाला एआयची जोड देऊन उत्पादन कसे वाढवता येईल?

PoCRA Phase 2: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्यासाठी १०० कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर

Indigenous Variety: आईच्या जपवणुकीला मुलाच्या प्रयोगाची साथ; गावरान वाणाची राष्ट्रीय नोंद

Rural Development: ‘बीडीओं’नी आठवड्यात १० गावांना भेटी द्याव्यात

Shivendrasinghraje Bhosale: वार्षिक योजनेतील निधी अखर्चित ठेवू नका

SCROLL FOR NEXT