Nandini Milk Price Hike Agrowon
ॲग्रो विशेष

Nandini Milk Price Hike : अमूलनंतर आता कर्नाटक दूधसंघानं दरात केली २ रूपयांची वाढ

Karnataka Milk Federation : गुजरात सहकारी दूध संघानं अमूल दुधाच्या दरात वाढ केल्यानंतर आता कर्नाटक दूध महासंघाने देखील दुधाच्या दराबाबत निर्णय घेतला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशात लोकसभा निवडणुकीनंतर निकालाच्या आधी गुजरात सहकारी दूध संघानं अमूलच्या दरात वाढ केली. त्यानंतर इतर दूध संघ दुधाच्या दरात वाढ करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. आता कर्नाटक दूध महासंघाने दुधाच्या दरात वाढ केली आहे. संघाने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केल्याचे निवेदनातून म्हटले आहे.

कर्नाटक सहकारी संघानं दूध दरात वाढ करण्याची घोषणा करताना म्हटले आहे की, संघाच्या दूध दरात २ रुपयांनी वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे आता कर्नाटक संघाचे दूध प्रति लिटर ४२ रुपयांऐवजी ४४ रुपयांना विकले जाणार आहे.

दक्षिण भारतातील सर्वात मोठी डेअरी 

कर्नाटक सहकारी संघ हा दक्षिण भारतातील सर्वात मोठा सहकारी दूध उत्पादक संघ आहे. हा दूध संघ कर्नाटक सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून चालवला जातो. कर्नाटक सहकारी संघाच्या १२ हजाराहून अधिक दुग्ध सहकारी संस्था कार्यरत असून २२.५ लाखांहून अधिक दूध उत्पादक संघाशी जोडले गेले आहेत. तर दूध, दही, तूप, लोणी, आईस्क्रीम, चॉकलेट्स आणि मिठाई या पदार्थाची विक्री नंदिनी या ब्रँडने संघाकडून केली जाते. सध्या संघ ९८.१७ लाख लिटर दुधाच्या खरेदी करतो. तर लवकरच एक कोटी लिटरचा आकडा संघ पार करेल.

अमूलच्या दरात वाढ 

गेल्या काही महिन्यापासून दुधाच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. यादरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूलच्या दरात वाढ केली. त्यापाठोपाठ मदर डेअरीकडून दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता दक्षिण भारतातील सर्वात मोठा दूध संघ असलेल्या कर्नाटक मिल्क फेडरेशनने दूध दरात वाढ केली आहे. 

शरद पवार यांचे राज्य सरकारला पत्र

गुजरात सहकारी दूध संघानं अमूल दुधाच्या दरात वाढ केल्यानंतर आता कर्नाटक सहकारी संघानं देखील वाढ केली आहे. यादरम्यान राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून देखील दुधाला रास्त भाव द्यावे अशी मागणी जोर धरू लागले आहे. यावरून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहून लक्ष घालण्याची विनंती केली होती. तसेच सरकारने यावरून लवकर तोडगा न काढल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. तर दुधाच्या दरात मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री सांगतिल तेथे आपण येऊ असेही पवार यांनी म्हटले होते.

नाना पटोले यांचा सरकारला इशारा

दरम्यान राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढवून द्यावेत, अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. तसेच राज्यातील भाजपप्रणित सरकार हे शेतकरीविरोधी असल्यानेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना रस्त्यांवर उतरावे लागले आहे. विविध राज्यांत शेतकऱ्याच्या दुधाला ४५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुधाला फक्त २७ रुपये भाव मिळत आहे. हेच दूध अमूल व इतर दूध कंपन्यांकडून ग्राहकाला ५५ ते ६० रुपये प्रति लिटर विकले जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने यात लक्ष घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढवून द्यावेत, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

असे असतील नवे दर 

ब्लू पॅकेट दूध (टोन्ड मिल्क) : ४२ रुपयांवरून ४४ रुपये

ब्लू पॅकेट दूध (होमोजेनाइज्ड टोन्ड दूध) : ४३ रुपयांवरून ४५ रुपये

ऑरेंज पॅकेट दूध (होमोजेनाइज्ड गायीचे दूध) : ४६ रुपयांवरून ४८ रुपये

ऑरेंज पॅकेट स्पेशल दूध : ४८ रुपयांवरून ५० रुपये

शुभम दूध : ४८ रुपयांवरून ५० रुपये

समृद्धी दूध : ५१ रुपयांवरून ५३ रुपये

शुभम (होमोजीनाइज्ड टोन्ड दूध) : ४९ रुपयांवरून ५१ रुपये

शुभम गोल्ड मिल्क : ४९ रुपयांवरून ५१ रुपये

शुभम डबल-टोन्ड दूध : ४१ रुपयांवरून ४३ रुपये झाले आहे आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT