Crop Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Variety : ‘विद्यापीठ निर्मित पीकवाण, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा’

Agriculture University Crop Variety : कृषी विद्यापीठात निर्मित विविध पीक वाणांसोबत लागवड व व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करून आर्थिक संपन्न व्हावे असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

Team Agrowon

Akola News : कृषी विद्यापीठात निर्मित विविध पीक वाणांसोबत लागवड व व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करून आर्थिक संपन्न व्हावे असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आयोजित रब्बी बिजोत्पादन प्रक्षेत्र भेट व विद्यापीठ शास्त्रज्ञ -बिजोत्पादक भागीदार चर्चासत्रात बोलत होते.

या वेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी व्यासपीठावर महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे (नागपूर), प्रमोद लहाळे (अमरावती), संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे,

शेतकरी उत्पादक कंपनी संघटनेचे राज्य अध्यक्ष अमोल रणदिवे, उपाध्यक्ष विलास गायकवाड, कृभकोचे क्षेत्रीय व्यवस्थापक आर. पी. पाटील, भाभा रिसर्चचे शास्त्रज्ञ डॉ. गोलू मिश्रा, डॉ. अर्चना जोशी, डॉ. राजेंद्र काटकर, डॉ. प्रमोद वाकळे, मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. वर्षा टापरे, बिजोत्पादन अधिकारी डॉ. शिवाजी नागपुरे, बियाणे संशोधन उपसंचालक डॉ. आम्रपाली आखरे उपस्थित होते.

डॉ. गडाख यांनी काळसुसंगत कृषी शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यसह बीजोत्पादन आदी उद्दिष्टांवर काम करणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शुद्ध, सकस बियाणे निर्मितीत आघाडी घेतली.

महाबीजसह शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्यांच्या मागणीनुसार मुबलक बियाणे उपलब्ध करून देण्याची कटिबद्धता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आम्रपाली आखरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर डॉ. वर्षा टापरे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: सहा लाखांवर शेतकऱ्यांना कर्जमाफी सोमवारपर्यंत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Raisin Price: बेदाण्याचे दर स्थिर

India Ethanol Supply: भारताचा इथेनॉल पुरवठा ८०० कोटी लिटरच्या पुढे

Maharashtra Monsoon Update: कोकणात पावसाचा जोर वाढला

India Dam Water Storage: देशातील १६६ धरणांत ५२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT