Dharmaraj Gokhale Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technology : प्रात्यक्षिकांतून शेती तंत्रज्ञान स्वीकारा : डॉ. गोखले

Dharmaraj Gokhale : शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकांतून शेतीविषयक तंत्रज्ञान स्वीकारावे. असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Jalna News : ‘‘शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकांतून शेतीविषयक तंत्रज्ञान स्वीकारावे. पॅकेजिंग, लेबलिंग तंत्रज्ञान आत्मसात करून जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करून उत्पन्न दुप्पट करावे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी व्यक्त केले.

दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई (डिघोळअंबा) येथे वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीत डॉ. गोखले बोलत होते. दीनदयाल शोध संस्थान बीड प्रकल्प प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक सुभाष साळवे, कृषी महाविद्यालय अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड,

कृषी विस्तार विद्यावेत्ता अंबाजोगाई डॉ. वसंत सूर्यवंशी, अंबाजोगाई तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर व केव्हीकेचे प्रमुख डॉ. वसंत देशमुख उपस्थित होते. अटारी पुणे येथील प्रतिनिधी डॉ. तुषार आथरे, दीनदयाल शोध संस्थानचे उपाध्यक्ष निखिल मुंडले व सदस्य डॉ. नितीन धर्मराव ऑनलाइन सहभागी झाले होते.

डॉ. गोखले म्हणाले, ‘‘केंद्राने प्रशिक्षणाद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार करावा. शेतकऱ्यांना एक पीक पद्धतीऐवजी जमिनीच्या प्रतवारीनुसार बहुपीकपद्धती घेण्यास प्रोत्साहित करावे. हवामान बदलामुळे आंतरपीक पद्धतीचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगावेत. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे.’’

साळवे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी शास्त्रशुद्ध माहिती हवी. एनएबीएल मृदा चाचणी प्रयोगशाळेची व्यवस्था बीड जिल्ह्यात होणे गरजेचे आहे.’’

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘ केव्हीके नावीन्यपूर्ण योजनांमध्ये सर्व घटकांचा समावेश करून प्रशिक्षण कार्यक्रम घेत आहे. शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विक्रीसाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म देणे गरजेचे आहे.’’ या प्रसंगी बायोडायनिक शेती पंचांग व सेंद्रिय शेती नोंदवही पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. राज्य शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त रवींद्र देवरवाडे व वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्राप्त संजय शिंदे यांचा सन्मान झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Fourth List: कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Fodder Self Sufficiency: दुष्काळात तोंगलाबादचा ‘चारा स्वयंपूर्णतेचा आदर्श ‘पॅटर्न’

Village Development Committees: स्थापन करा दुष्काळ आकलन, निवारण ग्रामविकास समिती

Farmer Issue: दुष्काळातही शेतकऱ्यांवर अन्याय!

Digital Agriculture Policy: डिजिटल सुसूत्रीकरणाचे स्वागतच!

SCROLL FOR NEXT